‘हुळे कन्स्ट्रक्शन’ची दादागिरी कुणाच्या जीवावर?…


आता जनतेनेच धडा शिकवण्याची गरज; मराठी भूमिपुत्रांना तालुका ब्लॉक काँग्रेसचा पाठिंबा, म. ए.समिती नेते कुठे? आहेत..

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

        गणेबैल टोल नाक्यावरील भूमिपुत्रांबाबत टोल कंपनीकडून दमदाटी सुरूच आहे, कायद्यानुसार किमान वेतन द्या, अशी मागणी बंड पुकारलेल्या कर्मचाऱ्यांची आहे. मात्र, ती मागणी मान्य करण्यास टोल कंपनी जाणूनबुजून चलढकल करत आहे, शिवाय लोकशाही मार्गाने कायद्यानुसार वेतन वाढीची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच अब्रु नुकसानीचा दावा ठोकण्याची धमकी टोल कंपनीकडून दिली जात आहे. याला दमदाटी म्हणावे की, दादागिरी असा प्रश्न उपस्थित होत आहे, याप्रकारे भूमिपुत्रांवर मीपणा करणाऱ्या या हुळे कंन्ट्रक्शनने कोणाच्या जीवावर दादागिरी चालविली आहे? याला आता नागरिकांनीच उत्तर देण्याची वेळ आली आहे. स्थानिक मराठी भूमिपुत्रांवर होणाऱ्या या अन्यायाविरोधातील आंदोलनाला तालुका ब्लॉक काँग्रेसने आपला पाठिंबा दर्शविला आहे, तालुका म.ए. समितीची भूमिका काय? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.

आयुक्तांच्या आदेशालाही जुमानले नाही….

      धारवाड प्रकल्प संचालक भुवनेश यांनी गणेबैल टोलला भेट देऊन नियमानुसार किमान वेतन द्यावेच लागेल अशी सूचना केली. मात्र, तरीही हुळे कन्स्ट्रक्शनने याही सूचनेला न जुमानता दादागिरी सुरूच ठेवली आहे. याची आमदार, खासदार तरी दखल घेतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे..

तालुका ब्लॉक काँग्रेसचा टोल कर्मचाऱ्यांना पाठिंबा…

    तालुका ब्लॉक काँग्रेसने टोल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे, त्यामुळे मोठे बळ मिळाले आहे, मात्र, भूमिपुत्रांना न्याय देणार म्हणणारे भाजप नेते व मराठीसाठी आमचा लढा असा अजेंडा असणारे म. ए समिती नेते स्थानिक मराठी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी पुढे येणार का?…. असा सवाल सामान्य जनतेला पडला आहे.. पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेते सुरेश जाधव, गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील, तोहीब, प्रमोद सुतार, राजू नाईक, लक्ष्मण मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *