July 21, 2026

अदिती नाडगौडा राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी राज्य प्रतिनिधी; बीईओ व अधिकाऱ्यांकडून सत्कार, अभिनंदन!

0
IMG_20260311_222517.jpg

तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव; 19 वर्षाखालील ज्युनियर राज्य नेटबॉल स्पर्धेचे करणार नेतृत्व….

  

खानापूर : लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)

      खानापूर  समर्थ न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी अदिती नाडगौडा हिने नेटबॉल स्पर्धेत चांगली चमक दाखविल्याने तिची 19 वर्षाखालील ज्युनियर राज्य नेटबॉल स्पर्धेची प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली असून, ती या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये राज्याचे नेतृत्व करतांना दिसणार आहे, कर्नाटक आमेचोर नेटबॉल अशोसिएशनने केली आहे. त्याबद्दल अदिती नाडगौडा हिचा बीईओ पी. रामप्पा, समन्वय अधिकारी मंजुनाथ, शंकर कमार, संतोष, स्कूलचे सचिव डॉ. डी. ई नाडगौडा यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. उत्तरप्रदेशमधील मेरठ याठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवर कर्नाटक राज्याचे नेटबॉल स्पर्धेचे नेतृत्व ती करणार आहे. अदितीला स्कूलच्या ॲडमिशन दिव्या नाडगौडा, मुख्याध्यापक बाळकृष्ण हलगेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *