अंगणवाडी इमारत झाली पूर्ण; नुकताच स्लॅब भरणीचा कार्यक्रम थाटात पडला पार…..
देवाचीहट्टी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
कधी चावडी, कधी गावचे विठ्ठल मंदिर तर कधी जुन्या पडक्या मराठी शाळेत लहानग्या बालकांना जीवांची पर्वा न करता शिक्षण घ्यावे लागत होते. याला साधारण 30 वर्षांचा इतिहास लोटला असून, इतक्या वर्षांपासून बालकांना अनेक हाल सोसावे लागले आहेत. त्याला आता पूर्णविराम मिळाला असून, आतापर्यंत सर्वात तरुण ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठणकर यांच्या रूपाने चांगला पुढारी मिळाला अन् त्यांच्याच प्रयत्नातून देवाचीहट्टीकरांचे स्वप्न झाले साकार…. नुकतेच बैलूर ग्राम पंचायत क्षेत्रात येणाऱ्या देवाचीहट्टी येथील अंगणवाडी इमारतीची स्लॅब भरणी पूर्ण झाली असून, अंगणवाडी बालकांना स्वतःची इमारत मिळाली आहे, त्यामुळे यापुढे बालकांची हेळसांड अर्थात त्रास कायमचे कमी होणार आहेत.
नुकतेच या इमारतीचा स्लॅब भरणीचा कार्यक्रम पार पडला, ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठणकर यांच्या हस्ते स्लॅब मशीनचे पूजन करण्यात आले, यावेळी मारुती कालमनकर, गोपाळ कवठणकर, पांडुरंग गावडे, सुनील केरीकर, पंचायत कर्मचारी तुकाराम कुंभार, महादेव कवठणकर,शिक्षिका सुजाता कुंभार, सुहास कवठणकर , कंत्राटदार मादार, स्वराज्य प्रदीप कवठणकर आदी मान्यवर उपस्थित होते…
प्रतिक्रिया –
नवीन अंगणवाडी इमारतीमुळे भविष्यातील बालकांचे शिक्षण आणि जीवन हे सुखमय होणारं आहे, इतक्या वर्षांपासून असलेली प्रतीक्षा संपणार आहे…
–सुनील केरीकर, प्रतिष्ठित नागरिक देवाचीहट्टी..






Leave a Reply