मी यादी मागण्यासाठी आज कार्यालयाकडे गेलो असता, दोन लॉक होते;; ते कोणी आणि का? लावले, याची, माहिती मिळाली नसल्याचे सडेकर म्हणतात…
लोकहित न्यूज’ची शंकर सडेकर यांच्याकडून दखल..
जांबोटी : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
कृषी पत्तीन कार्यालय हे सरकारी कार्यालय असतांना, अशा या शासकीय इमारतीला न सांगता लॉक घालणे कायदाबाह्य आहे. याची चौकशी झाली पाहिजे. नाही तर असं कोणी पण येईल आणि लॉक घालतील, तर मग कायद्याचे उरले काय? असा सवाल माजी ग्राम पंचायत सदस्य शंकर सडेकर यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना केला .
मी यादी मागण्यासाठी गेलो असता, कार्यालय लॉक होते….
मी कृषी पत्तीन निवडणूक लढवणार असल्याने मतदार यादी घेण्यासाठी कार्यालयाकडे गेलो होतो. त्यावेळी कार्यालयाला एक नाही तर दोन दोन लॉक लावल्याचे दिसून आले. कोणतीही पूर्वकल्पना, इशारा किंवा अडचण असल्याशिवाय कार्यालय बंद राहू शकत नाही. शिवाय कार्यालयाचा टाळा (लॉक) असतांना दुसरा कुलूप कोणी लावला. असे असताना गांभीर्याची बाब म्हणजे याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनाही नाही असे का? याबद्दल मी सचिवांकडे चौकशी केली असता, त्यांनी याविषयी आपल्याला कोणतीच माहिती नसल्याचे सांगितले… नेमका काय हा प्रकार आहे हे कळेनासे झाले आहे…
–शंकर सडेकर, माजी ग्राम पंचायत सदस्य जांबोटी..






Leave a Reply