
आजच्या विज्ञान प्रदर्शनात चंद्रयान, आधुनिक रोबोट, चंद्रग्रहण, हायड्रॉलिक पॉवर, पवन चक्की , सेंद्रिय शेतीसह परिसरातील सर्व घटक पैलूंचे सुंदर प्रक्षेपण….
जांबोटी: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)
पृथ्वीतळावरील सर्व जीवांसाठी विशेषकरून मानवी जीवनात बदल घडवत वाटचाल सोपी बनविणाऱ्या विज्ञानाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. मानव शिक्षणप्रगत झाला असून, त्याला नवनवीन विज्ञान संशोधनामुळे जग चंद्रावर जाऊन पोहचले आहे. तर याच विज्ञानामुळे मानवी शरीर, परिसर, विविध घटकांची माहिती मिळणे अवघत झाले आहे. त्यामुळे विज्ञान हे मानवी जीवनातील महत्वाचा घटक बनले आहे, तोच धागा पकडत आणि लहानपणासूनच विज्ञानाने क्रांती घडविलेल्या सर्व घटक, वस्तू आणि शोध यांचे प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विज्ञान प्रदर्शन भरविले जात आहे, त्यामुळे विद्यार्थांना विज्ञानाने दाखवून सर्व गोष्टी समजणे सोपे जात आहे. शनिवारी जांबोटी मराठी उच्च प्राथमिक शाळेत झालेल्या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अतिसुंदर वैज्ञानिक प्रात्यक्षिके सादर केली.
याचे उद्घघाटन शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष महेश जांबोटकर, उपाध्यक्ष विलास कवठणकर, सदस्य दर्शन नाईक, रविंद्र शिंदे, माजी ग्राम पंचायत सदस्य बाळकृष्ण जांबोटकर, राजकुमार देसाई, संतोष कुर्लेकर, विश्वनाथ घाडी, ईश्वर पेडणेकर, राजश्री परमेकर, भास्कर हळदणकर, यांच्यासह महिला सदस्या, मुख्याध्यापिका वृषाली घाडी, एम. एच. कालमनकर, सहशिक्षिका कोरव, कन्नड शिक्षिका, अतिथी शिक्षक विठ्ठल कोकरे, देसाई व पालकवर्ग उपस्थित होता.

विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाखण्याजोगा…
पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थांनी पृथ्वी तळावरील मानवी आणि सर्व जीव जंतुंच्या जीवनातील मोलाचे घटक, अवयव, परिसरातील उपयोगी गोष्टीचे प्रदर्शन उत्तमरित्या सादर केले होते. अंतरीक्ष यान, चांद्रयान पवनचक्की, सेंद्रिय शेती, चंद्रग्रहण, मानवी हृदय, शेतीचे वन्यप्राण्यांपासून रक्षण कसे करावे, पाण्यात वस्तू तरंगणारा प्रयोग, गुरुत्वाकर्षण, पृथ्वीचा समतोल, मातीतून तयार होणारा धातू प्रयोग, फुल पाखरांचे जीवनचक्र, मानवी फुफ्फुसे, पाणी स्वच्छता करण्याचा प्रयोग , दिवस -रात्र खेळ प्रयोग आदी मानवी जीवनात सबंध येणाऱ्या सार्व घटक, परिसरातील सर्व घटक व गोष्टींचे प्रदर्शन उत्तमरित्या सादर केले. त्याला शिक्षक व पालकांनी उत्साहाने दाद दिली… यातून मातृभाषेतील शिक्षण आणि जांबोटी केंद्र मराठी पूर्ण प्राथमिक शाळेतील शिक्षण जांबोटी भागातच लय भारी असण्याचे स्पष्ट होत आहे. यावेळी मुख्याध्यापिका व्ही. पी. घाडी यांनी स्वागत केले तर सहशिक्षिका कोरव यांनी आभार मानले..






Leave a Reply