माध्यमिक विभागात एक तर प्राथमिक विभागात तिघांनी पटकावला पहिला क्रमांक..
खानापूर: लोकहित न्यूज
खानापूर मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानने रविवारी ( दि. 22) घेतलेल्या प्रज्ञाशोध सामान्यज्ञान स्पर्धेत प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थांनी चांगलीच चमक दाखवली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिकच भर पडल्याचे दिसून येत आहे. यावेळी माध्यमिक विभागात एकच विद्यार्थी तर प्राथमिक विभागात तिघांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. आज शुक्रवार (दि.27), खानापुरात साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा दिनानिमित या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण केले जाणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर व सचिव वासुदेव चौगुले यांनी दिली.
कोण ठरले विजेते..…
प्राथमिक विभागात खानापूर मिलग्रीस चर्च शाळेची सन्मिता मारुती कुट्रे, रामगुरवाडी शाळेची वैष्णवी विलास ठोबरे व जळगे शाळेची गौरी हणमंत लाड या तिघींनी प्रथम क्रमांक पटकावला. खानापूर मिलग्रीस चर्चची राजनंदिनी शामराव पाटील, अमृता महेश पाटील, संहिता मलाप्पा पाटील, गर्लगुंजीची पूर्वा चांगदेव भातकांडे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, गणेश पराशराम मळवकर (ओलमणी), सायली निंगप्पा देसाई (खानापूर) , नेहल नागेश हेब्बाळकर (मिलग्रीस चर्च), वैभवी नागेश धबाले (गणेबैल) यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. मिलग्रीस चर्चची स्वरा संतोष पाटील, इडलहोंडची प्रांजळ चोपडे, हत्तरगुंजीची तनुजा विलास तिगडी यांचा चौथा क्रमांक, मिलग्रीसची आराध्या आ. पाटील, राधिका म. गोरे, विजय म. धामणेकर, नारायण भिकाजी पाटील यांचा पाचवा क्रमांक आला आहे, कौलापूर येथील लक्ष्मी विठ्ठल फोंडे, गर्लगुंजी येथील दिग्विजय मोहन भातकांडे, मिलग्रीस चर्चचा रिद्धीश महेश गुरव , गायत्री सागर बिर्जे, भक्ती पांडुरंग सुतार, उर्वा पुंडलिक अंधारे, हलशीचा मधुसुधन कृष्णा पाटील, कृष्णा गणपती पाटील, यांचा सहावा क्रमांक, मिलग्रीस चर्चचा साईराज सुभाष गुंडपिकर, धनश्री दिनेश जांबोटकर, गणेबैलचा प्रशांत डेळेकर यांचा सातवा, प्राविण्य शिवठाणकर (हारूरी) , मधु मल्हारी गुरव (गणेबैल), स्वराज्य संतोष पाटील( मिलग्रीस चर्च), श्रुती भ. गुरव ( गणेबैल), दिप्ती तुळजाराम पाटील (गर्लगुंजी), क्रांती केशव दळवी (कबनाळी), श्रेष्ठी भगीरथ पाटील यांचा आठवा क्रमांक आला आहे..
माध्यमिक विभागात विजय दळवी प्रथम, ताराराणी हायस्कूलच्या जान्हवी पाटील, निकिता चौरी द्वितीय, लोंढा हायस्कूलची अक्षता गावकर, ताराराणी हायस्कूलची , या दोघी तृतीय, शुभम गावडे (कणकुंबी माध्यमिक विद्यालय), साक्षी गुरव (ताराराणी हायस्कूल ), नियती गव्हाळकर (जांबोटी माध्यमिक विद्यालय), सारिका सुतार (ताराराणी हायस्कूल) , तर राजवीर इंगळे (जांबोटी माध्यमिक विद्यालय) यांनी चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. समृध्दी कंगराळकर पाचवा क्रमांक, आदित्य गुरव, दीप्तेश नाईक, ध्रुव नाईक ( कणकुंबी माध्यमिक विद्यालय) , श्वेता घाडी (ताराराणी हायस्कूल), अनुष्का पाटील, लोकोळी हायस्कूलची संपदा पाटील, नंदगड म. गांधी हायस्कुलची साक्षी होसुरकर, मंतुर्गा हायस्कुलची प्राची मादार, चेतन गोरल यांचा सहावा क्रमांक, मराठा मंडळ हायस्कुलची श्रेया गुरव, पल्लवी पाटील, ओलमणी शाहु हायस्कूलचा संकेत राऊत , शिवठाण हायस्कूलचा पार्थ इश्रानी, साहिल घाडी (माऊली विद्यालय कणकुंबी ), प्राची गोरे यांनी आठवा क्रमांक मिळवला.





Leave a Reply