‘शतकानंतर’ कुसमळी गवळीवाडावासियांनी पाहिला ‘सीसी रोड’


बैलूर पंचायत अध्यक्षा आरोही अनंत सावंत यांच्या प्रयत्नातून कुसमळी वॉर्डात विकास…

कुसमळी: लोकहित न्यूज( विलास कवठणकर)

देशाला स्वातंत्र्य मिळून आज 76 वर्षे पूर्ण झाली त्यानंतर जरी देशातील विकास सुरू झाला असला तरी त्याच्याही आधीपासून बैलूर ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील कुसमळी वॉर्डमधील गवळीवाड्याने गेल्या शंभर वर्षांपानंतर ग्राम पंचायत अध्यक्षा आरोही अनंत सावंत यांच्या अथक प्रयत्नातून पहिल्यांदाच काँक्रेट रस्ता पाहिला आहे. त्यामुळे गावात एकच आनंदाचे वातावरण होते. नुकतेच या रस्त्याचे ग्राम पंचायत अध्यक्षा आरोही अनंत सावंत यांच्याहस्ते रस्त्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनंत सावंत यांच्यासह वाड्यातील नागरिक उपस्थित होते.

  

अध्यक्षांकडून विकासच विकास……

      कुसमळी वॉर्डच्या सदस्या व विद्यमान अध्यक्षा आरोही अनंत सावंत यांनी आपल्या कार्यकाळात कुसमळीसह पंचायत क्षेत्रात सर्वच बाबतीत विकास साधला आहे. यामध्ये महत्वाचे म्हणजे सुसज्ज ग्राम पंचायत इमारत आपल्या काळात उभी केली आहे. शिवाय अनेक घरे, रस्ते, शौचालय, अंगणवाड्यासह सर्व बाबतीत विकास साधला आहे. पुढील वर्षी कुसमळीत होऊ घातलेल्या लक्ष्मी यात्रेनिमित्त गावातील बहुतेक रस्ते, शौचालय व यासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, एवढा विकास सहकारी सदस्य व गावकऱ्यांच्या सहकार्यानेच शक्य झाल्याची प्रतिक्रिया अध्यक्षा आरोही अनंत सावंत यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *