खानापूर मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान व राज्य मराठी विकास संस्थेकडून आयोजन; सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता व चालू घडामोडींवर असेल परीक्षा, शुक्रवारपर्यंत (ता.20) नाव नोंदणी करा...
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान व राज्य मराठी विकास संस्थेकडून रविवार दिनांक 22 रोजी ‘सामान्य ज्ञानशोध‘ परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांपासून या दोन्हीं मराठी संस्थांकडून तालुक्यातील मराठी शाळांची दर्जा सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभतं असून, मुलांच्या ज्ञानातही भर पडत आहे. त्याच अनुषंगाने यंदाही ही सामान्य ज्ञानबोध परीक्षा ठेवण्यात आली असून, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, चालू घडामोडींवर ही परीक्षा असेल. यासाठी येत्या शुक्रवारी (दि.20) पर्यंत स्पर्धा परीक्षेत भाग घेणाऱ्यांनी खानापूर बस स्थानकावर असलेल्या प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या कार्यालयात आपल्या नावाची नोंद करावी असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी केले आहे.
उत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या ‘कला- गुणांना मान’ देण्यासाठी पारितोषिके.…
प्राथमिक ते सातवी(प्राथमिक)आणि आठवी ते दहावी (मध्यमिक)असे दोन गट करण्यात आले आहेत, प्राथमिक विभागासाठी -3500, 2500, 2000, 1500, 1000, 800, 700, 500 अनुक्रमे अशी एकूण आठ बक्षिसे असतील. तर माध्यमिक विभागासाठी -अनुक्रमे 4000, 3000, 2500, 2000, 1500, 1200, 1000, 700 बक्षिसे देण्यात येतील.
‘ज्ञानबोधा’तून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन…
ज्ञानबोधातून विद्यार्थ्यांचे मूल्यमान होण्यास मदत होईल, शिवाय परीक्षांची तोंडओळख व्हावी या हेतूने मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान व राज्य मराठी विकास संस्थेकडून दरवर्षी ही परीक्षा भरविली जाते. त्यामुळे मुलांना वाव मिळत असून, मराठी शाळांचा दर्जा सुधारण्यास मदत होत आहे, या दोन्हीं मराठी संस्थांच्या उपक्रमाबद्दल तालुक्यातून कौतुक केलं जात आहे…






Leave a Reply