स्वयंभू मारूती (हब्बनहट्टी ) तीर्थक्षेत्राला आमदारांची भेट…


नाटकापूर्वीच्या सभेसाठी होते आमंत्रण; आजी माजी मान्यवरांची राहणार उपस्थिती…

हब्बनहट्टी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

        श्री स्वयंभू मारूती हब्बनहट्टी तीर्थक्षेत्रावर आजपासून मालिका असलेल्या महाशिवरात्रीनिमित आयोजित केलेल्या नाटकापूर्वीच्या सभेला आमंत्रित केल्याप्रमाणे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी रविवारी (दि.14) हजेरी लावली. यावेळी त्यांनी प्रथमतः मारुती, शिव आणि राम लक्ष्मी सीतामाई मंदिराचे दर्शन घेतले.

     यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य चिदंबर गावकर, खानापूर युवा आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील, गर्लगुंजी पीकेपीएस चे संचालक राजू सिद्धानी, कमिटीचे कार्याध्यक्ष नेताजी घाडी, हबनहट्टी ग्राम पंचायत सदस्य नागोजी पाटील. देवाचीहट्टी ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठणकर, कृष्णा भरणकर, पत्रकार विलास कवठणकर, राजू डांगे , कमिटीचे सचिव संतोष कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

        


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *