गावचे गावठाण, अंगणवाडी, स्मशानभूमीचे काम प्रगतीपथावर; ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठणकर यांची माहिती…
देवाचीहट्टी : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
बैलूर ग्राम कार्यक्षेत्रात येणाऱ्या देवाचीहट्टीतील काँक्रेट रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. देवाचीहट्टी येथील महत्वाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री चव्हाटा मंदिर जवळील चव्हाटा गल्लीतील या रस्त्यासाठी 5 लाखाचा निधी शासनाकडून मंजूर होता, त्यासाठी ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठणकर यांनी प्रयत्न करून तो निधी योग्यपणे राबवून घेतला. त्यामुळेच हे कमी वेळेत पूर्ण होऊ शकले असे गावकऱ्यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना सांगितले. जवळपास 130 मीटरच्या या रस्त्यासाठी 5 लाखाचा निधी मंजूर होता, त्यातून पक्के काँक्रेट टाकण्याची योजना आखण्यात आली. आणि त्यानुसार हे झाल्याचे पंचायत अभियंते बसवराज यांनी सांगितले.

यावेळी हणमंत गावडे, ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठणकर, मारूती कुंभार, माजी सैनिक रमेश कांबळे, अंजय कवठणकर, बळीराम कालमनकर , रामलिंग बुरुड आदी गावकरी उपस्थित होते.
गावठाण, अंगणवाडी, स्मशानभूमीसह विकास कामे प्रगतीपथावर….
गावठाण’ प्रकरण – युवा ग्राम पंचायत सदस्य म्हणून निवडून येताच गावातील अनेक वर्षांपासून रखडलेली विकास कामे प्रदीप कवठणकर यांनी मार्गी लावली. अनेक वर्षांपासून गावची महत्वाची समस्या म्हणून ओळखल्या जाणारे गावचे गावठाण हा कळीचा मुद्दा ठरला होता. त्या मुद्द्याला आजपर्यंत कोणी हात लावायचे धाडस दाखवले नाही. गावच्या भविष्यासाठी ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठणकर, पत्रकार म्हणून विलास कवठणकर व गावातील आणखी वीस नागरिकांनी (त्यांची नावे वेळेप्रसंगी प्रसिद्ध करण्यात येतील) यासाठी राज्यस्तरीय लढा दिला. एकूण सहा एक्करच्या घरात गावात खुले गावचे गावठाण असून, त्यावर मोजक्याच लोकांनी कब्जा मिळवला होता. मात्र, नागरिकांनी तक्रार करताच हा सर्व प्रकार जिल्हा पंचायतीने बोगस ठरवला आणि तत्काळ पंचायतीच्या मालकीची सदर जागा ताब्यात घेण्याचा आदेश जिल्हा पंचायत सीईओनी बजावला. त्यानुसार दाखल झालेली काहीं बोगस नावे कॅन्सल करून ही जागा पंचायतीच्या नावावर चढण्यात आली आहे, मात्र, सद्या हे प्रकरण न्यायालयात असले तरी तेथेही अंतिम टप्प्यात असून, या महिन्यात त्याचाही निकाल आमच्या बाजूने लागणार असल्याची माहिती पीडीओ सागरकुमार बिरादार यांनी दिली.

अंगणवाडी इमारतीमुळे चिमुकल्यांना मिळाले ‘आंगण’….
गेल्या तीस वर्षा आधीपासून गावात अंगणवाडी नसल्याने कधी मंदिर, तर मराठी शाळा तर कधी गावच्या चव्हाट्यावर अंगणवाडी वर्ग भरावे लागत होते. परिणामी सध्याही धोकादायक परिस्थितीत शिक्षणाची पहिली पेरी चढणाऱ्या चिमुकल्यांना सध्या स्लॅब ला आलेल्या नवीन इमारतीमुळे चिमुकल्यांना सुखाचे अनेक वर्षानंतर सुखाचे आंगण मिळणार आहे. चव्हाटा मंदिराच्या बाजूलाच सुसज्ज अंगणवाडी इमारतीचे काम सुरू असून, ते लवकरात लवकर पूर्ण होऊन वर्ग भरण्यासाठी उपलब्ध असेल अशी माहिती ग्रा. पं. सदस्य प्रदीप कवठणकर यांनी दिली.
गावच्या खेळाडूंना मिळाले ‘सुपर ग्राउंड’… नरेगामुळे स्मशानभूमीचे काम ‘प्रोसेस’मध्ये …..

सरकारी पड जमीन असूनसुद्धा त्यामध्ये ग्राउंड निर्माण करणे तितके सोपे नसते. असे असतानाही सुसज्ज अशा क्रिकेट ग्राउंडची गावच्या पाठीमागे म्हणजेच देवाचीहट्टी तोराळी रोडवर सुपर ग्राउंड निर्माण करण्यात आले आहे. यामुळे अनेक हौशी क्रिकेटपटूंना वाव मिळणार आहे. सदर ग्राउंड शासकीय दप्तरी नोंद करतांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. त्याचे अजूनही थोडे प्रशासकीय काम शिल्लक आहे, त्याचीही लवकरच पूर्तता करण्यात होणार आहे. याबद्दल बोलतांना देवाचीहट्टीचे आयकॉन प्लेअर व माजी सैनिक रमेश कांबळे कांबळे यांनी या ग्राउंडसाठी प्रयत्न केलेल्या सेवकांचे आभार मानले. ते म्हणाले लगतच्या तीन गावांमध्येच हे ग्राउंड सुंदर आहे असेही ते म्हणाले. गावातील प्रत्येक व्यक्तीचा शेवट हा असतोच, पण गावनिर्मितीपासून गावात स्मशानभूमी नाही, तीही यावेळी मंजूर करण्यात आली असून, नरेगाच्या काहीं अडचणीमुळे हे काम शासकीय प्रोसेस मध्ये आहे. तेही लवकरच पूर्ण असा विश्वास प्रदीप कवठणकर यांनी व्यक्त केला.






Leave a Reply