गोवा सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती; तिरुमला तिरुपती संचालकानी धावपळ करत, सादर केला माफीनामा…
पणजी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
वार्षिक ऑडिट रिपोर्ट सादर न करणे, सहकार खात्याने दिलेल्या नोटीसला प्रतिसाद न दिल्याने गोवा सहकार खात्याने तिरुमला तिरुपती सोसायटीच्या 13 शाखांची दिलेली एनओसी (परमिशन) रद्द केली होती, त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. आपापल्या रक्कम काढून घेण्यासाठी ठेवीदारांची सोसायटीत रांग लागली होती. बुधवारी या सोसायटीच्या संचालकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली असता, त्यांनीही आवश्यक ती कागदपत्रे तत्काळ सादर करा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी भेटीवेळी संचालक मंडळाला दिला होता. त्यानुसार तिरुमला तिरुपती सोसायटीने सहकार खात्याकडे कागदपत्रे सादर केली आहेत, शिवाय सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांचीही संचालक मंडळाने भेट घेतली.
त्यावेळी सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सहकार खात्याचे निबंधक आशितोष आपटे यांच्याशी संपर्क साधून कागदपत्रांची तपासणी करून मला अहवाल सादर करा असा आदेश दिला आहे. त्यानुसार बुधवारपर्यंत याबाबत अहवाल मिळेल त्यानंतर पुढील निर्णय जाहीर करू अशी माहिती सहकार मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
तिरुमला तिरुपती सोसायटीचा माफीनामा;; एनओसीचा निर्णय मागे घेण्याची विनंती…
सहकार खात्याने नोटीस जारी करूनही कोणताच प्रतिसाद न देणाऱ्या तिरुमला तिरुपती सोसायटीने अखेर सहकार खात्याकडे आपला माफीनामा सादर केला असून, गोव्यामध्ये नव्याने उघडण्यात येणाऱ्या 13 शाखांची रद्द केलेली एनओसी मागे घेऊन परवानगी देण्याची विनंती सोसायटीच्यावतीने करण्यात आली आहे. मात्र, कागदपत्रे तपासणीनंतर यावर निर्णय घेतला जाईल असे सहकार खात्याकडून सांगण्यात येत आहे…
गोव्यातील एनओसीची चंदगड बेळगांव परिसरात चर्चा.….
गोव्यातील एनओसीची चंदगड, बेळगांव परिसरात जोरदार चर्चा रंगली होती, बेळगांव आणि चंदगड येथील तिरुमला तिरुपती सोसायटीच्या शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवली आहे, सोसायटीने एजंटांची (मध्यस्थी) नेमणूक केली असून, त्यांच्यामार्फत गुंतवणूक केली जात आहे. गोव्यातील या सोसायटी बाबतच्या घटनेने आपलीही रक्कम सुरक्षित आहे का? अशीच चर्चा रंगल्याचे दिसून आले.. या सोसायटीने आवश्यक ती शासकीय खबरदारी घेऊन कारभार चालवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे…






Leave a Reply