जांबोटी मराठी उच्च प्राथ. शाळेच्या एसडीएमसी अध्यक्षपदी महेश जांबोटकर तर उपाध्यक्षपदी विलास कवठणकर यांची निवड…


जांबोटी पंचायत सचिव नारायण पाटील नोडल अधिकारी तर सीआरसी विठोबा दळवी मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती…

     

जांबोटी:: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

       जांबोटी केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या शाळा सुधारणा समितीची आज निवड करण्यात आली असून, अध्यक्षपदी महेश जांबोटकर तर उपाध्यक्षपदी विलास कवठणकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जांबोटी ग्राम पंचायत सचिव नारायण पाटील यांनी नोडल अधिकाऱ्याची भूमिका बजावली तर जांबोटी आणि कणकुंबी विभागाचे सीआरसी विठोबा दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेच्या मुख्याध्यापिका वृषाली घाडी यांनी स्वागत केले.

       यावेळी यावेळी सदस्य म्हणून दर्शन गो.नाईक, राम ना. बावकर, विश्वनाथ स. घाडी, बाळकृष्ण गो. जांबोटकर, रविंद्र रा. शिंदे, राजकुमार अ. देसाई, मनोह नाईक, संतोष द. कुर्लेकर, विनय शं. कोटीभास्कर, गुंडू ल. जांबोटकर महिलांमध्ये हर्षला ह. इंगळे, लक्ष्मी ना. पाटील, मिनल मा. जांबोटकर, आरती अ. जाधव, मलप्रभा म. झेंडे, जयश्री शि. घावरे यांची निवड करण्यात आली आहे.

विचारविनिमय करून एका दिवसात सदस्य आणि अध्यक्ष उपाध्यक्ष निवड…

        सुवातीला इच्छुक उमेदवारांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली त्यानंतर 18 जणांच्या सदस्य कमिटीने अध्यक्ष- उपाध्यक्षांची निवड केली. यावेळी पंचायत सचिव नारायण पाटील, सीआरसी विठोबा दळवी, महेश जांबोटकर,विलास कवठणकर , सहशिक्षक एम .एच कालमनकर यांची भाषणे झाली. राजकुमार देसाई यांनी अध्यक्ष -उपाध्यक्ष निवडीला अनुवादन दिले.  यावेळी दिनेश हळदणकर, प्रशांत पेडणेकर यांच्यासह सर्व पालक, सहशिक्षक डी.डी कडली, पी पी. कोरव, एम.एच कालमनकर, व्ही. बी कोकरे, डी.डी कांबळे, ए.जी देसाई उपस्थित होते. सहशिक्षक एम .एच कालमनकर यांनी आभार मानले.

   

      

     

           


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *