देवाचीहट्टीत जलजीवन मिशनअंतर्गत हर घर स्वच्छ पाणी (जीजीएम) योजनेचा शुभारंभ…
देवाचीहट्टी :: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)
पृथ्वीतलावरील प्रत्येक प्राणी, पक्षांचे पाण्याशिवाय जीवन व्यर्थ आहे, अर्थात काय पाणी हा घटक प्रत्येक जीवाच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. आजकाल बेसुमार झाड तोडीमुळे पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण घटत चालले आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने किमान दहा झाडांची तरी लागवड करावी तरच यापुढच्या पिढीचे जीवन सुखकर होईल, नाही तर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. ज्या ठिकाणी मुबलक पाणी आहे, त्या ठिकाणी हर घर स्वच्छ पाणी अर्थात जीजीएम या केंद्राच्या मत्वपूर्ण योजनेमुळे खेडोपाड्यात नियोजनबद्ध पाणीपुरवठा होत आहे, असे याच योजनेअंतर्गत पाणीपुरवठा सुरू असलेल्या गावांतून सांगितले जाते. तीच योजना याही ठिकाणी राबविण्यात आली असून, त्यामुळे देवाचीहट्टीकरांचे जीवन सुखकर होईल,असे मत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले.

आज देवाचीहट्टी येथील जीजीएम योजनेचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठणकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला, पिडीओ सागरकुमार बिरादार यांनी स्वागत केले. यावेळी ईओ रमेश मेत्री, माजी जि. पं. सदस्य लक्ष्मण बामणे, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण झांजरे, माजी सैनिक रमेश कांबळे, माजी ग्राम पंचायत सदस्य सुरेश कुंभार, मारुती कालमनकर, पंचायत कर्मचारी तुकाराम कुंभार, गोपाळ कवठणकर, विक्रम धुरी गावकरी व महिलावर्ग आदी उपस्थित होते.






Leave a Reply