जांबोटी मराठी उच्च प्राथ. शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर गेला होता दणाणून; पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थांची देशपर भाषणे झाली….
जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
जगामध्ये लिखित मोठी लोकशाही आणि संविधान म्हणून आपल्या देशाची ओळख आहे. मात्र, आज त्यानुसार आपले वाटचाल होते का? हा चिंतनाचा विषय असून, फक्त लोकशाही उत्सव म्हणून माझी आठवण नको, संविधान नियमांचे पालन झाले पाहिजे असे मत जांबोटी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या चौथीच्या विद्यार्थ्यांनी आराध्या घाटगे हिने मांडले. देशभर साजऱ्या झालेल्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी भारत माता बोलतेय या विषयावर आपले तिने विचार मांडले. मुख्याध्यापिका वृषाली घाडी यांनी स्वागत केले. व्यासपिठावर एसडीएमसी अध्यक्ष महेश जांबोटकर, उपाध्यक्ष संतोष कुर्लेकर, ग्राम पंचायत सदस्य बाळकृष्ण जांबोटकर, शाळा सुधारणा समिती सदस्य संतोष पाटील दिनेश हळदणकर यांच्यासह सर्व सदस्य, पालकवर्ग उपस्थित होते.

पुढे, बोलतांना आराध्या म्हणाली की, मी भारतमाता म्हणून मला सर्व समान आहेत असे मी समजते. पण,अलीकडे माझ्या लेकींची छळवणूक होताना दिसत आहे, ती थांबली पाहिजे. तुम्हीं सर्वांनी मिळून मला शपथ द्या की,तुम्ही माझ्या लेकींचे रक्षण कराल! असे सुंदर विचार तिने मांडले. यावेळी पहिलीपासून ते सातवीपर्यंतच्या बहुतेक विद्यार्थांची भाषणे झाली. यावेळी पालक म्हणून लोकहित न्यूजचे संपादक विलास कवठणकर यांच्यासह शाळेचे सहशिक्षक, अतिथी शिक्षकांनीही आपले विचार मांडले.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर प्रसन्न ; हेच माय मराठी शाळेचे महत्व….
सुरवातीला अध्यक्षांच्याहस्ते ध्वजवंदन झाले, मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्रवीरांच्या फोटोंचे पूजन करण्यात आले. गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनींच्या डान्स गायनाने पालक आणि परिसर प्रसन्न होऊन गेला होता. मुख्याध्यापिका वृषाली घाडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमाची रूपरेषा आखली होती, त्यानुसार अती सुंदररित्या कार्यक्रम साजरा झाला. पहिलीच्या मुलांनी स्टेजवर येऊन भाषण करणे म्हणजे ते एक शिक्षकांचे मोठे यश मानावे लागेल. त्यामुळेच जांबोटी उच्च प्राथमिक मराठी शाळा जांबोटी पश्चिम भागात उत्तम शाळा म्हणून नावाजली जाते.






Leave a Reply