मोठा गट प्रथम 51 हजार, द्वितीय 41 हजार तर लहान गटासाठी प्रथम 25 हजार, द्वितीय 21 हजार बक्षिस….
कसबा नंदगड: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
कसबा नंदगड (ता. खानापूर) येथे उद्या गुरुवार दिनांक 22 रोजी लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर पुरस्कृत बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेटच्या माध्यमातून हौशी खेळाडूंना वाव देण्याबरोबर आता शेतकऱ्यांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलगाडा शर्यतीलाही आमदारांकडून दाद दिली जात आहे. त्या उद्देशानेच ही शर्यत ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेंमध्ये मोठा आणि लहान असे दोन गट करण्यात आले आहेत. यानिमित तालुक्यातील आजी माजी मान्यवरांना अमंत्रीत करण्यात आले आहे..

मोठ्या गटासाठी बक्षिसे अशी.…
प्रथम 51 हजार, द्वितीय 41 हजार, तृतीय 31हजार, चौथे 25 हजार, पाचवे 21 हजार, सहावे 18 हजार अशी एकूण 12 बक्षिसे देण्यात येतील.
लहान गटासाठी बक्षिसे अशी असतील…
बक्षीस अनुक्रमे 25 हजार, 21 हजार, 18 हजार, चौथे 15 हजार अशी एकूण 12 बक्षीसे ठेवण्यात आली आहेत…






Leave a Reply