आमटेत होणार क्रिकेटचे ‘सुसज्ज’ मैदान !


आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडून पाहणी; ग्रामीण भागातील क्रिकेटसह क्रीडा क्षेत्राला देणार चालना….

आमटे: लोकहित न्यूज (क्रीडा प्रतिनिधी/विलास कवठणकर)

       शिक्षणाबरोबर, खेळही शारिरीक तंदुरुस्तीसाठी तितकाच महत्त्वाचा घटक मानला जातो. त्याची चांगलीच जाण असलेल्या आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडून क्रीडा क्षेत्रालाही समृद्ध बनवण्याचा त्याचा मानस आहे. त्यानुसार त्यांच्याकडून क्रिकेटला चालना दिली जात आहे. जांबोटी पश्चिम भागात आतापर्यंत पार पडलेल्या बहूतेक गावातील क्रीडा स्पर्धांना आमदार हलगेकर यांनीच पारितोषिके दिली आहेत, शिवाय चिखलेसह काहीं गावामध्ये लवकरच या स्पर्धा होणार असून,त्या आमदार विठ्ठल हलगेकर पुरस्कृत आहेत. यातील एक भाग म्हणून आमटेत ( ता. खानापूर) सुंदर असे क्रिकेट मैदान बनवले जात आहे, त्याची नुकतीच आमदार, लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील यांच्याकडून पाहणी करण्यात आली. यावेळी दौलत कोलीकर, अशोक गावकर, महेश गावकर, कल्लाप्पा गावकर, पवन गायकवाड, मिथून कुंभार, दत्ता कदम, शंकर पाटील, पवन गाकवाड यांच्यासह आमटेतील क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

          


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *