माझ्या काळात तालुक्यातील एकही रस्ता विकासापासून राहणार नाही: आ. विठ्ठल हलगेकर…


हब्बनहट्टी ( जांबोटी)तीर्थक्षेत्रावर रक्तदान शिबिराचे आयोजन; जांबोटी भाजप युवा कार्यकर्त्यांचे आमदारांकडून कोडकौतुक…

  

विलास कवठणकर: हब्बनहट्टी लोकहित न्यूज

      तालुक्यात केंद्राकडून 80 कोटींच्या रस्त्यांचे काम प्रगतीपथावर असून, माझ्या काळात तालुक्यातील एकही रस्ता विकासापासून राहणार नाही, अशी ठाम ग्वाही देतानाच रक्तदान शिबीर आयोजित करून एक वेगळा सामाजिक आदर्श दिल्याबद्दल जांबोटी विभाग भाजप युवा कार्यकर्त्यांचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी कोडकौतुक केले. हब्बनहट्टी (जांबोटी) श्री स्वयंभू मारूती तीर्थक्षेत्रावर बुधवारी (दिनांक 7) लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर उपक्रमाच्या व्यासपिठावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हब्बनहट्टीचे ग्राम पंचायत सदस्य नागोजी पाटील होते. सामाजिक आणि युवा भाजप कार्यकर्ते अनंत सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

    व्यासपिठावर जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका भाजप अध्यक्ष बसवराज सानिकोप, माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबलजी, आवरोळी मठाचे मठाधीश चन्नबसव देवरु, माजी सभापती सुरेश देसाई, भाजप नेते लक्ष्मण झांजरे, जिल्हा भाजप महिला मोर्चा सचिव धनश्री सरदेसाई, तालुका भाजप प्रधान सचिव मल्लाप्पा मारीहाळ, तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील, गर्लगुंजी पीकेपीएसचे माजी अध्यक्ष राजू सिद्धनी,  महादेव गावकर, सचिव गुंडू तोपिनकट्टी उपस्थित होते. मान्यवरांच्या दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

   पुढे, बोलतांना आ. हलगेकर म्हणाले की, विकास करणे हा माझा अजेंडा आहे आणि तो कायम राहील. तालुक्यातील पाच मोठ्या गावांच्या लक्ष्मी यात्रांसह ग्राम गाव पातळीवर अंगणवाड्यांचे काम, शाळांचे, ग्राम पंचायत इमारतींचेही प्रगतीपथावर आहे. पंचहमी योजनांना निम्मा सरकारी निधी जात असल्याने इतर विकासावर थोडा परिणाम झाला आहे. पण, काही दिवसानंतर तीही अडचण दूर होईल असेही ते म्हणाले.

पक्षातील काहीं कार्यकर्त्यांना आमदारांकडून तंबी..

    आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडुन मागे आपल्याच विरोधात चर्चा करणाऱ्या कार्यकर्त्यांना यावेळी चांगलेच सुनावले, ते म्हणाले की, मी एका व्हिडिओमध्ये पाहिले आहे की, आमच्याच पक्षातील काही कार्यकर्ते पाठीमागे आमची चर्चा करतात म्हणजे आपल्याच घरात आपण भांडण करणे आहे, तुम्हाला काहीं विचारायचे असेल तर माझ्याशी डायरेक्ट बोलू शकता असे आवाहन करतानाच त्यांनी बंगळूर येथील आपल्याच पक्षातील नाराज कार्यकर्त्यांच्या बंद खोलीत झालेक्या चर्चेचे उदाहरण दिले.  तुम्हीच निवडून दिलेल्या तुमच्याच पक्षातील आमदारांची मागे चर्चा करता म्हणजे विरोधी म्हणावे का? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. शेवटी बोलतांना त्यांनी एकत्र संवाद साधून राहण्याची सूचना उपस्थित कार्यकर्ते नेत्यांना दिली…

कोण काय म्हणाले…

     जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी आमचा पक्ष तालुक्यात मजबूत असून, येणाऱ्या जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकीसाठी सज्ज राहण्याची गरज असल्याचे सांगितले.

जिल्हा भाजप महिला मोर्चा सचिव धनश्री सरदेसाई, यांनी रक्तदान शिबिराचे कौतुक केले, मी स्वतः आरोग्य क्षेत्रात वावरत असल्याने मला रक्तदानाचे महत्त्व चांगलेच माहीत आहे, आजचा हा सामाजिक उपक्रम अनेकांचे आयुष्यमान वाढवणारा आहे, आजच्या या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करणाऱ्या जांबोटी युवा भाजप कार्यकर्त्यांचे मी पुन्हा एकदा कौतुक करते असेही त्या म्हणाल्या…

माजी तालुका भाजप अध्यक्ष संजयजी कुबल यांनी, आजच्या आमदारांच्या उपक्रमाचे कौतुक करत, अनेकांचे जीवन सुधारण्यासाठी घेण्यात आलेले हे मोठे पाऊल असून, आमदारांच्या माध्यमातून विकास सुरू आहे, कार्यकर्त्यांनी एकत्र राहण्याचा सल्ला दिला.

जांबोटी विभाग जेष्ठ भाजप नेते लक्ष्मण झांजरे, यांनी तालुक्यात सर्वत्र विकास सुरू असून, आमदारांचे समाधानकारक कार्य सुरू आहे. कार्यकर्त्यांनी भरकटू नये असे सांगतानाच पूर्वी म. ए समितीसारख्या बलाढ्य संघटनेशी लढा देणे म्हणजे फार कठीण होते, अलीकडे ते कमी झाले असून, जांबोटी भागात आपणच मजबूत आहोत, त्यामुळे येणाऱ्या जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकीत मला तिकीट मिळाले नाही, त्याला मिळाले म्हणून मी कशाला काम करू असे कोणी न समजता पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र राहायचं आहे असेही त्यांनी पुढे बोलतांना स्पष्ट केले. यावेळी आवरोळी मठाच्या मठाधिशानीही मार्गदर्शन केले.

तीस दानशूरांनी केले महा -रक्तदान ….

       कालच्या शिबिरात तीस दानशूर युवकांनी केले महा -रक्तदान . यामध्ये सर्व प्रकाराच्या रक्ताचा समावेश असल्याने त्याचा सर्वांनाच उपयोग होणार आहे, त्यामुळे या सर्व दानशूरांचे तालुक्यातून कौतुक होत आहे. सामाजिक आणि जांबोटी युवा भाजप कार्यकर्ते अनंत सावंत, दौलतराव कोलीकर, पवन गायकवाड, शंकर गावडे, प्रभाकर शेंगाळे, मिथुन कुंभार, विलास गायकवाड, मंगेश मुळीक, कृष्णा भरणकर, सचिन साबळे, मदन कुडतूरकर यांच्यासह सर्वांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याबद्द्ल उपस्थित नेत्यांनी या उपक्रमाचे कोडकौतुक केले.

   यावेळी लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील, जांबोटी पंचायतीचे उपाध्यक्ष सुनिल देसाई, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष महेश पाटील, सदस्य मंजुनाथ मुतगी, जांबोटी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश सडेकर, आमटे ग्राम पंचायत उपाध्यक्ष लक्ष्मण गुरव, प्रकाश गुरव, नामदेव केरकर, टी. के. बिर्जे, प्रकाश माजगावी, निंगप्पा पाटील, मिलिंद डांगे, राजू कुर्लेकर, भुजंग कणकुंबकर, सागर दळवी, महेश गावकर , प्रशांत काजुनेकर, नागेश तळवार यांच्यासह जांबोटी भागातील सर्व कार्यकर्ते व तालुक्यातील पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

    


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *