खानापूर पोलिसांच्या दबंगगिरीचा ‘गॉडफादर’ कोण? नागरिकांचा प्रश्न…

0
Screenshot_20251228_132120.jpg

सीपीआय तालुक्याचे ‘साब ..? ! ‘मटका, गांज्या, क्रिकेट बेटिंग, जमिनीतून लुटालुट, बेकायदेशीर वाळू वाहतुकीला पोलिसांचे बळ? ; तर दुसरीकडे याच पोलिस खाकीची सामान्य नागरिकावर दमदाटी , काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा…

विलास कवठणकर: लोकहित न्यूज (विशेष वृत्त)

       आधीच खानापूर तालुका म्हणजे बेकायदेशीर धंद्यांचा अड्डा, चोरटे व्यवसाय, यात विशेषकरून सामान्य नागरिकांना लुटण्याचेही धंदे जोरात सुरू आहेत बर का! असे असतानाही खानापूर पोलीसांनी यावर नियंत्रण आणण्याचे सोडून उलट सामान्य जनतेवरच दादागिरी चालविल्याच्या घटना वाढल्या आहेत, त्यामुळे प्रश्न असा पडतो आहे की, हे पोलिस कायद्याचे रक्षक आहेत की भक्षक हेच कळेनासे झाले आहे. खानापूरचे पोलिस ठाणे न्यायव्यवस्थेऐवजी हुकूमशाहीचा अड्डा बनल्याचे चित्र आहे, प्रश्न असा पडतो की, पोलिसांची दादागिरी एवढी का? वाढली, त्यांना कोणाचा वरदहस्त लाभला आहे. पोलिसात तक्रार घेवून जाणाऱ्या सामान्य नागरिकावरच पोलिस दमदाटी करतात अशा तक्रारी खानापूर ब्लॉक काँग्रेसकडे आल्या असून, हा प्रकार वेळीच न थांबल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस नेते सुरेश जाधव यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिला आहे.

बेकायदेशीर धंद्यांचा कळस; मटका, गांज्या, बेटिंग, बेकायदेशीर वाळू वाहतुक , जमिनीतून लुटालुट जोरात, तरीही पोलिसांची डोळेझाक....

     तालुक्यात मटका, गांज्या, क्रिकेट बेटिंग, जमिनीतून लुटालुट, बेकायदेशीर वाळू वाहतुक जोरात सुरू आहे, तरीही पोलिस गप्प का? सामान्य जनतेचा तालुका अशी खानापूरची ओळख आहे, ती आज पुसून जाताना दिसत आहे. याविरोधात नागरिकांनी आवाज उठवला तर दाबला जातो, नेतेमंडळी मात्र, आपल्या सोयीनुसार मूग गिळून गप्प! अशा परिस्थितीत पोलिसांची दबंगगिरी होणार नाही तर नवलच!पोलिस ठाण्यात कोणी तक्रार घेऊन गेले तर त्यांना न्याय देण्याचे सोडून मिटवामिटवी करून जणू चोरांनाच सपोट केला जातो असे का? तर मग सामान्य नागरिकांनी जावे कुठे?

बेकायदेशीर क्लब कोणाचे ,गांज्या, क्रिकेट बेटिंग कोण करतय?

      तालुक्यात बेकायदेशीर क्लब जोरात चालतात, गांज्या विक्री, क्रिकेट बेटिंग कोण करते याचा पोलिसांना शोध घेणे गरजेचे बनले आहे. या सर्व गोष्टींचा उलगडा झाला पाहिजे असे सामान्य नागरिकांचे मत आहे.

चौकट –

सीपीआय (पीआय) म्हणजे तालुक्याचे  ‘साब ‘…?

      सध्याचे सीपीआय लालसाब गवंडी हे तर तालुक्याचे ‘साब ‘ बनून बसले आहेत , मुख्य कायदा रक्षक म्हणून पोलिस निरीक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, पण तेच नॉट रिचेबल असतील तर काय करावे? … त्यांना कधीही कॉल केला तर घेतच नाहीत, ते तालुक्यात आहेत की, शिवाय सामान्य नागरिकांकडून कधीही व्यवस्थित बोलत नाहीत, दमदाटी करूनच बोलतात नेहमीच अशी तक्रार  केली नाहीत,. यावर एसपी, डीवायएसपी यांनी याचा पाठपुरावा करण्याचे धाडस करतील का? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.

….आमदारसाहेब जरा बघा हिकडे….

       तालुक्याचे ‘दार’ म्हणजेच आमदार अशी ओळख आहे, त्यामुळे त्यांचाच अधिकार पहिल्यांदा चालला पाहिजे, आणि काहीं तालुक्यात चालतोही! कारण तालुक्यात कोणताही अधिकारी यायचा असल्यास आमदार लेटर अनिवार्य आहे, नसेल सत्तेत असणाऱ्या माजी आमदार वा प्रभावी पदाधिकाऱ्यांचे पत्र लागते, याला प्रोटोकॉल म्हणतात. तसे सध्या चालतेही, पण, खानापूर तालुक्यात जरा वेगळेच चित्र आहे. हिकडे एकदा सेवेत रुजू झालेले अधिकारीच नंतर शिरजोर बनण्याची पद्धत रूढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरीकांच्या समस्यांसाठी आमदार विठ्ठल हलगेकर साहेबांनी जरा पोलिसांकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे..

प्रतिक्रिया

    मी डीवायएसपी डॉ. विरेप्या हिरेमठ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनाही काहीं कळेनासे झाले. तात्काळ हे प्रकार थांबले पाहिजेत नाही तर तालुका ब्लॉक काँग्रेस गप्प बसणार नाही असा इशारा दिला आहे…

  • सुरेश जाधव , तालुका काँग्रेस नेते.

आमच्याकडेही अशा तक्रारी आल्या आहेत, त्याची वरिष्ठांना पूर्व कल्पनादेऊन पाठपुरावा केला जाईल. शिवाय बेकायदेशीर धंद्यांवर नियंत्रण आणले जाईल.

-डॉ. विरेय्या हिरेमठ, डीवायएसपी खानापूर विभाग..

      

     

       

     

       


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed