देशवासीयांना दिल्या ख्रिसमस नाताळच्या शुभेच्छा…
नवीदिल्ली : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
काल देशभरात ख्रिसमस नाताळ हा ख्रिश्चन धर्मियांचा सन मोठया उत्साहात साजरा झाला. यावेळी गोवा, मुंबई, दिल्ली, बंगळूर चेन्नई , पुणे सारख्या मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातील नव्याव जुन्या चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आली, यावेळी धर्मगुरूकडून भक्तांनी आशिर्वाद घेतले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनीही दिल्ली येथील ‘द कॅथेड्रल ऑफ रेडेमशन‘ या प्रसिध्द चर्चमध्ये जावून दर्शन घेत प्रार्थना केली. यावेळी श्री. मोदी यांनी ख्रिश्चन धर्मीय गुरूंकडून आशिर्वाद घेतले. तसेच देशवासीयांना ख्रिसमस नाताळच्या शुभेच्छा दिल्या . बेळगांव, खानापूर जांबोटी भागातही हा सन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला..






Leave a Reply