बैलूर ग्राम पंचायत इमारतीची स्लॅब भरणी; सर्व सदस्य, मान्यवरांची उपस्थिती…
बैलूर: लोकहित न्यूज(विलास कवठणकर)
आमच्याच काळात सुसज्ज ग्राम पंचायत इमारत उभारण्याचे भाग्य लाभले ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, यासाठी उपाध्यक्ष सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून, लवकर या इमारतीचे काम पूर्ण करण्यात येईल असे मत, बैलूर ग्राम पंचायत चेअरमन आरोही अनंत सावंत यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली. काल (बुधवारी) नूतन इमारतीच्या स्लॅब भरणीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अध्यक्षा आरोही अनंत सावंत, उपाध्यक्षा रेणुका सुतार यांच्या हस्ते काँक्रेट मशीनचे पूजन करण्यात आले. सदस्य विठ्ठल नाकाडी, लक्ष्मण बणार, प्रदीप कवठणकर, रवी गुरव, मिलन कांबळे, कांचन बिर्जे यांच्याहस्ते स्लॅब कॉलचे पूजन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनंत सावंत, तुकाराम बिर्जे, मनोहर कांबळे, विट्ठल राजगोळकर, निंगप्पा पाटील, नारायण कालमनकर, पंचायत इंजिनिअर बसवराज, पुंडलिक हेब्बाळकर यांच्यासह पंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.







Leave a Reply