ठळक बातम्या..


खानापूर -जांबोटी: लोकहित न्यूज…

     1) –उद्या गुरुवार दिनांक 25 श्री स्वयंभू मारूती हब्बनहट्टी तीर्थक्षेत्रावर श्री स्वयंभू मारूती मंदिरासमोर नवीन फरशी बसवणे योजनेचे पूजन, आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासह विविध मान्यवर राहणार उपस्थित.

1) नीलावडे भागातून हत्ती जागा सोडेना, दोन दिवसांपूर्वी गावीरेडा कळप आणि हत्तीकडून ऊस , खळ्यातील भाताची नुकसान. तालुका वनखाते हत्तीच्या पालत्यावर, नुकसान भरपाई कधी आणि किती मिळणार? शेतकऱ्यांचा प्रश्न…

3) खानापूर मराठा मंडळ ते राजा स्टाईल जणू राजाच बनला का? अनेकवेळा तक्रारी करूनही कंत्राटदाराची मनमानी. घाई गडबडीत कसेही काम उरकण्यासाठी कंत्राटदाराची धावपळ, याबाबत विचारणार कोण?? हा प्रश्न…

4) चोर्ला रोडचे काम म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्यासारखेच चित्र.. हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे, याबाबत अनेकवेळा बातम्या , तक्रारी येऊनही कंत्राटदार दाद देईना… त्याला कोणाचा वरदहस्त आहे म्हणायचे; आमदार विठ्ठल हलगेकर साहेब तुम्हीं तरी एकदा हिकडे फेरी मारा ना!

5) लोकायुक्तानी घेतली कृषी अधिकाऱ्याची पाठ, बेकायदेशीर मार्गाने जमवलेली माया उघड्यावर! कोटींची संपत्ती सोने, चांदी लोकायुक्तांच्या हाती. यापुढेही कारवाई सुरूच राहणार सूत्रांची माहिती…

6) जांबोटी भागात दबंगगिरी करणारा कणकुंबीकडील एका भ्रष्ट पीडीओवर कारवाईची टांगती तलवार; प्रजा नेरळू या बेळगावातील प्रसिद्ध कन्नड दैनिकातील ‘भ्रष्ट पंचायत वृत्त मालिकेचा’ चिफ सेक्रेटरी यांच्याकडूनच होणार पंचनामा! आणखी कोणा कोणाचा नंबर लागणार?

7) भविष्यात पाणी संकट ओढवणार असतानाही कुसमळीजवळील मलप्रभेत सूरू असलेल्या डॅम बाबत जांबोटी भागातील कोणा नेत्या आणि पब्लिकला काहीच सोय सुतक नाही. जांबोटी भागातील पाण्याची पळवा पळव थांबणार तरी कधी? कुसमळी पुलाखालील गावांना पाणी समस्या जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. आताच सरकारशी चर्चा करणे गरजेचे नाही का? …

8) माजी लोकप्रिय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्म शताब्दीनिमित्त खानापूर भाजकडून दिपोत्सव. आजी माजी आमदार, अध्यक्ष पदाधिकाऱ्यांची उपस्थिती.

9) खानापूर शिवस्मारक विकासाबाबत आमदार विठ्ठल हलगेकर, शिवस्मारक ट्रस्ट, तालुका पंचायत अधिकाऱ्यांची बैठक संपन्न..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *