शिवसेना नेते के. पी. पाटील यांचे मा.आ. अरविंद पाटील यांना खुले आव्हान; व्हिडिओ व्हायरल….


  अरविंद पाटील यांच्याकडुन अपशब्द वापरल्याचा शिवसेना नेते के. पी पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल; चापगाव पीकेपीएसमधील वड्डेबैल येथील बिनविरोध निवडीवरून विषय चर्चेत…

चापगाव:  लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

     चापगाव ( ता. खानापूर) कृषी पत्तीन (पीकेपीएस) संघाच्या निवडणुकीच्या हलचाली गतिमान झालेल्या असतानाच, याच संघामध्ये येणाऱ्या वड्डेबैल येथील दोघांच्या निवडीवेळी माजी आमदार तथा डीसीसी बँक संचालक अरविंद पाटील यांनी शिवसेना नेते के.पी पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा के. पी पाटील यांनी बोलतानाचा व्हिडिओ जोरात वायरल होत आहे. त्यामध्ये  के. पी पाटील सांगताहेत की, अरविंद पाटील यांनी आपल्या (वड्डेबैल) गावात जावून के. पी. पाटील हे कमिशन एजंट असून, माझ्याकडे पावतीसह पुरावा आहे असे अरविंद पाटील यांनी लोकांसमोर सांगितल्याचे के.पी पाटील म्हणताहेत, शिवाय  गावच्या लोकांसमोर अरविंद पाटील यांनी सोमवारच्या आत बोललेले खरे करून दाखवावे असे खुले आव्हान के.पी पाटील यांनी सदर व्हिडिओमध्ये दिले आहे, त्यामुळे चापगाव पीकेपीएस राजकारण चांगलेच तापण्याचे चिन्हं दिसत आहे.

….सदर व्हिडिओमध्ये काय म्हणताहेत के.पी पाटील…

       वड्डेबैल गावात मंदिराचे काम सुरू असून, त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे मंदिरासाठी कोणी मदत देईल त्यांच्या गळ्यात संचालकपदाची माळ घालावी असे आमचे म्हणणे असताना अरविंद पाटील यांनी गावात येऊन मीटिंग घेऊन काही लोकांना हाताशी धरून दोघांची बिनविरोध निवड केली. त्याचवेळी तुम्हीं के.पी पाटील यांचे  काय? ऐकता ते तर मधले कमिशन एजंट आहेत, त्याचा माझ्याकडे पावतीसह पुरावा असल्याचे माजी आमदार अरविंद पाटील यांनी म्हटल्याचे के.पी पाटील यांनी सांगताहेत. पुढे बोलतांना के.पी पाटील म्हणताहेत की, जे काहीं अरविंद पाटील यांनी माझ्याबद्दल बोलले आहेत, ते सोमवारच्या आत पुराव्यानीशी  खरे करून दाखवावे असे सांगताच खोटे खोटे बोलून, नारळ शपथ भीती दाखवून निवडून आणणे कितपत योग्य आहे असेही शिवसेना नेते के.पी पाटील यांनी सांगताहेत…

     

    

    


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *