उद्यापासून (बुधवार -17) पासून दिमाखात होणार लीगला सुरवात; एकूण 12 संघांचा सहभाग…
ओलमणी: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)
अलीकडे विविध क्लब आणि संघाच्यावतीने क्रिकेट स्पर्धा भरवून भागातील हौशी खेळाडूंना वाव देण्याचे उत्तम कार्य सुरू आहे, त्यातीलच एक म्हणजे ओलमणी ( ता.खानापूर) येथील ओलमणी स्पोर्टस क्लबच्यावतीने माजी आमदार अरविंद पाटील पुरस्कृत ओलमणी क्रिकेट लीगच्या चौथ्या पर्वाला उद्या (बुधवार दि. 17 ) दिमाखात सुरवात होत आहे, ओलममणी क्रिकेट लीग म्हणजे जणू जांबोटी भागातील आयपीएलच अशीच चर्चा चौका चौकात रंगली आहे. जिल्हा आणि तालुक्यातील आजी -माजी मान्यवरांना अमंत्रीत करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 12 संघांनी भाग घेतला असून, यातील प्रथम विजेत्यास 1 लाख एक हजार, द्वितीय विजेत्यास 70 हजार एक रूपये बक्षिस देण्यात येणार असून, त्याशिवाय वैयक्तिक पारितोषिकेही बहाल करण्यात येतील.







Leave a Reply