समर्थ न्यू इंग्लिश स्कूलचा आज ‘चामराजनगर ‘ स्पर्धेत दिमाखात होणार सहभाग….


राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेपर्यंत मजल बद्दल तालुक्यातून कौतुकाची थाप…

बंगळूर: लोकहित न्यूज (क्रीडा प्रतिनिधी)

        खानापूर  समर्थ न्यू इंग्लिश स्कूलचा आज चामराजनगर येथील आंबेडकर स्टेडियमवर होत असलेल्या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत दिमाखात सहभाग होत आहे. 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थांनी या स्पर्धेत चांगलीं चमक दाखवली अन् त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. कालच बेळगांव रेल्वे स्थानकातून विजयी खेळाडू चामराजनगरच्या दिशेने रवाना झाले असून, आज ते येथील राज्यस्तरीय स्पर्धेत दिमाखात पाऊल ठेवतील. समर्थ न्यू इंग्लिश स्कूलचे सचिव व तालुका डॉक्टर असो. अध्यक्ष डॉ. डी. ई नाडगौडा, नेटबॉल क्रीडा शिक्षक बाळकृष्ण हलगेकर, स्कूलचा अडमिन सौ. दिव्या नाडगौडा, अश्विनी गुरव, सचिन गुरव, श्री. नारोना, यांनी खेळाडूंना विजयी शुभेछा दिल्या.

नेटबॉल राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये निवड झालेले समर्थ न्यू इंग्लिश स्कूल पहिलेच…

      समर्थ न्यू इंग्लिश स्कूलने आणखी एक मानाचा तुरा खानापूरच्या अभिमानात रोवला आहे. राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेले समर्थ न्यू इंग्लिश  हे एकमेव स्कूल आहे. या स्कूलमधील 22 विद्यार्थांची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचें तालुक्यातून कौतुक होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *