जांबोटीत सोमवारी भव्य राम मंदिराचे भूमिपूजन….
आमदार, माजी आमदारांसह -जिल्हा तालुक्यातील मान्यवर राहणार उपस्थित…
जांबोटी: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)
जांबोटी भागातच प्रसिद्ध मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांबोटी रामापुर येथील श्री राम मंदिराच्या नूतन मंदिराचा भूमिपूजनाचा भव्य कार्यक्रम सोमवारी 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजता पार पडणार आहे. त्यानिमित्त आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार तथा केपीसीसी सचिव डॉ अंजली निंबाळकर, माजी आमदार तथा डीसीसी बँक संचालक अरविंद पाटील , प्रसिद्ध सीए (इन्कमटॅक्स) अभय फडके, गोवा मुख्यमंत्र्यांचे स्विय सहायक उपेंद्र जाधव , माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, माजी केडीपी सदस्य प्रकाश पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत, तर प्रमूख वक्ते म्हणून माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल व तालुका भाजप युवा नेते पंडित ओगले यांनी हजर राहतील. तर स्वागताध्यक्ष म्हणून मारूती पेडणेकर आणि शंकर कुडतुकर यांनी पाहुण्यांचे स्वागत करतील. … सदर कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका लोकहित न्यूज माध्यमातून प्रसिद्ध करत आहोत… तरी अमंत्रित पाहुण्यांनी वेळेवर हजेरी लावावी अशी विनंती, पंच कमिटी, राम मंदिर उत्सव कमिटी , बांधकाम कमिटी युवा वर्ग रामापूरपेठ जांबोटी यांच्यावतीने करण्यात येत आहे…

