हरवलेली मूर्ती पुन्हा परत मिळाली; मूर्तीचा अभिषेक, लघु रुद्राभिषेक, भजन अशा कार्यक्रमांचे आयोजन…
कणकवली: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)
कृष्णानगरी जाणवली (ता.कणकवली) येथे बुधवार दिनांक 3 डिसेंबर रोजी श्री स्वयंभू दत्त सेवा चॅरिटेबल ट्रस्ट जाणवली यांच्यावतीने श्री स्वयंभू दत्त मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडेल तर गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे साजरा होणारा श्री दत्त जयंती उत्सव अशा दुहेरी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तरी परिसरातील आणि तालुक्यातील भाविकांनी या उत्सवाचा लभ घ्यावा, असे आवाहन मधुकर रा. मोहिते आणि मिनाक्षी म. मोहिते यांच्यावतीने करण्यात येत आहे.
….कार्यक्रमाची रूपरेषा अशी….
बुधवार दिनांक 3 रोजी श्री दत्त मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा सकाळी 8 वा. होमहवन पार पडेल, गुरुवारी 4 रोजी दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, सकाळी 8 वाजता मूर्तीचा अभिषेक, 9 ते 12.30 वा. रुद्राभिषेक, त्यांनतर आरती होईल. सकाळी 8 पासून दर्शन सुरू असेल. दुपारी 1 वाजता महाप्रसाद, दुपारी 2 नंतर भजन, सायंकाळी 5.30 वा. नामकरण सोहळा पार पडणार आहे.
चौकट –
चोरीला गेलेली मूर्ती पुन्हा सापडली…
सदर मूर्ती चोरीला गेली होती, काहीं दिवसांनी त्याच ठिकाणीं सापडली आहे, त्यामुळे देवाचा महिमा अगाध मानला जात आहे. त्यामुळे पुन्हा या मूर्तीचा मोठ्या उत्साहाने प्राणप्रतिष्ठापना आणि दर वर्षीप्रमाणे साजरा होणारा श्री दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे….






Leave a Reply