,

रो -कोंची कमाल – एकटा ‘सिक्सर किंग’ तर ‘दुसरा शतकवीर’अन् भारत विजयी..


भारताने 349 रणांचे आव्हान देताना 17 रणांनी द. आफ्रिकेवर मिळवला विजय…

रांची: लोकहित न्यूज क्रीडा प्रतिनिधी ( विलास कवठणकर)

       रो – को अर्थात रोहीत शर्मा आणि विराट कोहली यांच्या करीयरबाबत चर्चा होत असताना, आजच्या सामन्यात हिटमॅन रोहीत सिक्सर किंग ठरला तर किंग कोहली शतकवीर झाला. रोहितने आजच्या सामन्यात तीन सिक्स लगावून जागतिक 351 सिक्साचे वर्ड रेकॉर्ड तोडत स्वतःचे रेकॉर्ड तयार केले आहे. तर विराटने मास्तर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे 51 शतकांचे रेकॉर्ड तोडले आहे, विराटच्या नावावर आता 52 शतकांचे रेकॉर्ड बनले आहे. आजच्या दोघांच्या उत्तम खेळीने आणि गोलंदाजीच्या जोरावर भारताने द. आफ्रिकेवर पहिला विजय मिळवत 1- 0 अशी बडत मिळवली आहे. दुसऱ्यांदा फलंदाजी करताना द. आफ्रिकेच्यावतीने बॉसने एकेरी लढत देण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला!

विराट- रोहित चमकले…

भारताचा माजी यशस्वी कर्णधार रोहीत शर्मा आणि विराट कोहलीच्या क्रिकेट करीयरबाबत चर्चा होत असताना, आजच्या रांची येथील पहिल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहीत शर्मा आणि विराट कोहली या दोघानाही वेगवेगळी रेकोर्ड आपल्या नावावर केली. रोहितने 351 सिक्स हे शहीद आफ्रिदी याच्या नावावर असलेले रेकॉर्ड तोडले आहे, आजच्या सामन्यात रोहितने 3 सिक्स लगावत एकदिवसीय सामन्यात 352 सिक्स नावाचे नवे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे. तर कोहलीने 52 शतके करत सचिनचे रेकॉर्ड मोडले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *