,

रांचीत उद्या भारत – आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिकेत ‘रोहित, विराटची ‘एन्ट्री’ 


वर्षानंतर घरच्या दोघेही मैदानात उतरणार ; गील, अय्यर जायबंदी; केएल राहुलचे नेतृत्व….

रांची: क्रीडा प्रतिनिधी (विलास कवठणकर)

      रांचीत उद्या (रविवार -30) दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात तीन एकदिवसीय क्रिकेट मालिका सुरू होत, असून भारताचे स्टार फलंदाज माजी कर्णधार रोहीत शर्मा आणि विराट कोहली यांची ‘एंट्री’ होत आहे. दुपारी 1 वा. टॉस होईल, त्यांनतर 1.30 वाजता सामन्याला सुरवात होईल . एकदिवस कर्णधार शुभमम गिल, उपकर्णधार श्रेयस अय्यर , हार्दिक पांड्या हे तिघेही जखमी असल्याने केएल राहुलकडे कर्णधाराचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. शिवाय स्टार गोलंदाज जसप्रीत बुम्राह याला विश्रांती देण्यात आली आहे. परवा परवा झालेल्या आफ्रिका आणि भारत यांच्यातील कसोटीत भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे, त्यामुळे नेहमीच वादात असणाऱ्या प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या कार्यपद्धतीवर बीसीसीआय नाराज असल्याचे वृत्त आहे.. त्यामुळे रोहीत, विराटमुळे कसोटी पराभवाचा वचपा काढणार का? असाच प्रश्न क्रिकेप्रेमींना पडला आहे..

असा असेल भारतीय संघ…

रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, केएल राहुल ( कर्णधार -विकेट किपर) , तिलक वर्मा, रिषभ पंत ( विकेटकिपर) , वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, नितिशकुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, हर्षदीप सिंग, ध्रुव जुरेल.

आफ्रिका संघ असा..

     टेंभू बावूमा (कर्णधार) , ओटमिन बार्टमन, कर्बिन बॉस, म्याथू बीटझके, ड्रेवाल ब्रेव्हीस, नांद्रे बर्गर, क्विंटन डीकॉक, टोनी डी झोरझी, रुबिन हरमन, केशव महाराज, मार्को यान्सन, एडन मर्क्रम, लुंगी एंनगुडी, रॉयल रिकल्टन, प्रेनलन सुब्रायन.

  


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *