मंतूर्गा भागातील उगवतात ‘तारा’ म्हणजे भाजपाचे ‘युवा नेते’ विशाल (गजानन) पाटील भाऊ….


  -विशाल गजानन पाटील

गजानन (विशाल) पाटील ..

    खानापूर: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)

              आपण समाजाचे काहीं तरी देणे आहे, नेहमीच्या या भावनेतून सामाजिक कार्यात हेरारीने भाग घेणाऱ्या आणि गाव आणि तालुक्यातील समस्यांचा सरकारदरबारी पाठपुरावा करण्यासाठी ते नेहमीच पुढे असणारे, असे मंतूर्गा (ता. खानापूर) गावचे सामाजिक कार्यकर्ते तथा तालुका भारतीय जनता पक्षाचे युवा नेते गाजनन (विशाल) गुंडू पाटील यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा होत आहे. मंतूर्गा गावचा उगवता ‘तारा’ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. लोकहित न्यूजतर्फे पाटील यांना खूप खूप शुभेच्छा!

   

सामाजिक सुधारणेसाठी झटणारे व्यक्तिमत्व…

      गाव असुदे किंवा तालुक्यातील सामाजिक सुधारणेसाठी गजानन पाटील यांनी नेहमीच झटत असतात, आमदार,तालुक्यातील नेत्यांचे ते जवळचे असल्याने कोणत्याही समस्या तत्काळ सोडवून घेत असतात. खानापूर ते मंतूर्गा बससेवा त्यांनी सुरू करून गावच्या वाहतुकीचा प्रश्न निकाली लावला आहे.  गावची शाळा मोडकळीस आली होती, त्याचा पाठपुरावा करत आमदार, आधिकाऱ्यांना सदर शाळेची समस्या सोडवण्यास भाग पाडले. शिवाय आपले गाव परिसर आणि तालुक्यातीलही समस्या ते सरकारदरबारी मांडत असतात.यातून त्यांची सामाजिक तळमळ दिसून येते.

मंतूर्गा कृषि पत्तीन संघाच्या उपाध्यक्षपदाची त्यांच्याच हाती धुरा..

       मंतूर्गा गावात कृषि पत्तीन स्थापन करून शेतकऱ्यांना सरकारी लाभ मिळवून देण्याची तळमळ विशाल (गजानन) पाटील यांनी दाखवून दिली आहे. सद्या ते या संघाच्या उपाध्यक्षपदाची यशस्वीरित्या धुरा सांभाळत आहेत. भाजपचे खंदे समर्थक अशीही त्यांची तालुक्यात ओळख निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया

   समाजाबद्दल मला अफाट तळमळ आहे, मी एक लहान कार्यकर्ता असलो तरी आमदार, माजी आमदार, भाजपा नेते आणि तालुक्यातील आधिकाऱ्यांशी चांगलीच जवळीक असल्याने समस्या सोडवण्यास कोणतीच अडचण येत नाही. माझ्या गावाबरोबरच परीसर आणि तालुक्यातील सामान्य नागरीकांच्या समस्या सोडविण्याचे मी वत्त घेतले आहे. पहिल्यांदा समाज सुखी आणि नंतर आम्हीं अशी माझी भावना आहे.

विशाल (गजानन) पाटील, भजपाचे युवा नेते..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *