कोण होणार? जांबोटी क्रिकेट ‘लीग’चा ‘हीरो’ ; आज ठरणार..


आज सकाळच्या सत्रात सेमी फायनल तर दुपारनंतर फायनल युद्ध होईल; हजारों प्रेक्षकांची राहणार उपस्थिती…

  

जांबोटी: विलास कवठणकर (लोकहित न्यूज)…

          गेल्या आठवडाभर क्रिकेटप्रेमींना उत्सव ठरलेल्या जांबोटी क्रिकेट ‘लीग’ चा आज होणार एंड. सकाळच्या सत्रात सेमी फायनल होईल तर दुपारनंतर फायनल युद्ध होईल. लगेच तासाभरात ( 9.30  वाजता शिवांश क्रिकेटर्स आमगाव विरूद्ध एसएन पोल्ट्री नागुर्डा यांच्यात पहिला सेमी फायनल तर  दुपारी 2 वाजता प्रणाली  स्ट्रायकर्स विरूद्ध सातेरी देवी स्पोर्ट्स तोराळी यांच्या दुसरा सेमी फायनल होईल. या दोन्हीं सामन्यातून विजयी संघ फायनलमध्ये पोचतील, फायनचा हा सामना दुपारी तीननंतरच रंगेल. आज रविवारी त्यात सामन्यांची चुरस वाढल्याने आजचे सामने पाहण्यासाठी हजारों प्रेक्षकांची उपस्थिती असेल. बक्षिस वितरणाचा मान्यवर उपस्थित राहणार आहेत…

  


शनिवारी रोचक सामने पार पडले….

      शनिवारी सुपर ऐटसाठी झालेल्या तळावडे विरुद्ध चीखले यांच्यात चिखले संघाने बाजी मारली, आमगाव विरूद्ध हब्बनहट्टीमधील सामन्यांत आमगाव संघ विजयी झाला. तोराळी विरुद्ध बैलुर यांच्यातील सामन्यांत तोराळी संघ सरस ठरला… तर देवाचीहट्टी विरुद्ध नागुर्डा यांच्यातील सामना रंगतदार स्थितीत असतांना ऐनवेळी नागुर्डा संघाने विजय मिळवला…

   

    


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *