शेतकरी संघटना आणि ग्रीन आर्मीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर..
बेळगांव : लोकहित न्यूज..
शेतकऱ्यांच्या समस्या सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (8 डिसेंबर) रोजी शेतकरी परिषद भरवण्याची परवानगी द्यावी, या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी महमद रोशन यांना शेतकरी संघटना आणि ग्रीन अर्मीच्यावतीने देण्यात आले. या निवेदनात, शेतकरी मोठ्या अडचणीत असून, जनावरे आणि शेतीबाबत होणारी नुकसान थांबायचे नाव घेईना. तर स्थानिक आधिकारी आणि आमदार यांच्याकडून म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अधिवेशनाच्या काळात सर्वच मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी बेळगावला येत आहेत, आमच्या समस्या आणि अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शेतकरी परिषद भरवण्याचा आम्हीं निर्णय घेतला आहे. त्याला जिल्हा प्रशासनाची परवानगी हवी आहे, ती आपण मिळवून द्यावी अशी विनंती डीसीसींकडे करण्यात आली आहे. निवेदन स्वीकारल्यानंतर डीसींनी याबाबत पाठपुरावा करण्यात येईल असे प्रत्युत्तर दिले. यावेळी राज्य शेतकरी संघटना अध्यक्ष चुनाप्पा पुजेरी, शेतकरी नेते शशिकांत पडसलगी, किशन बंडी, सत्याप्पा मल्लापुरी, राजू पवार, कुमार वर्दी, मंजू पूजेरी यांच्यासह शेतकरी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
मृत जनावरांना 1 लाख रूपये सरकारी भरपाई द्या….

लंम्पीसह जनावरांना येणाऱ्या वेगवेगळ्या रोगराईमुळे शेतकरी हतबल झाला आहे. परिणामी वेळेत सरकारी पाठपुरावा केला जात नाही, आणि झालाच तरी तटपुंजी भरपाई मिळते, त्यामध्ये शेतकऱ्याला थोडाही लाभ मिळत नाही. भरपाईत वाढ करुन ती किमान एक लाखापर्यंत तरी द्यावी अशी आमची मागणी आहे. त्याची सरकारने पूर्तता करावी, अशा प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त केल्या जात आहेत….






Leave a Reply