बिहारमध्ये दहाव्यांदा ‘नितीराज ‘…


जनतेत नीतिशकुमार क्रेझ कायम; भाजपच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी घेतली गोपनीयतेची’ शपथ ‘

   

पाटणा: लोकहित न्यूज नेटवर्क ( विलास कवठणकर)

      देशातच दहा वेळा मुख्यमंत्री होण्याचा ‘विक्रम ‘ नितिशकुमार यांच्या नावावर नोंद झाला असून, जनतेत त्यांची ‘ क्रेझ’ कायम टिकून असल्याचे पुन्हा एका यावेळी दिसून आले. गुरुवारी सकाळच्या सत्रात बिहारचा शपथ विधी पार पडला तेंव्हा तब्बल दहा वेळा  नितिशकुमार यांनी मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. त्यांच्यासोबत भाजपचे सम्राट चौधरी, विजयकुमार सिंन्हा यांनीही उपमुख्यमंत्रीपदासाठी गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी भाजपच्या 14 , जेडीयूच्या 9 , रामविलास पासवान यांच्या पक्षाला दोन तर इतर पक्षांना एक मंत्रीपद यावेळी देण्यात आले. 

26 मंत्र्यांनी घेतली शपथ… गृहखाते नितिशकुमार यांच्याकडेच राहण्याची शक्यता…

    मुख्यमंत्री नितिशकुमार, भाजपचे दोन उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजयकुमार सिन्न्हा यांच्यासह एकूण 26 मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. बिहारमधील एकूण 243 जागांपैकी एनडीएने 202 जागा जिंकत मोठा विजय मिळवला आहे, त्यामुळे सरकार स्थापनेस कोणतीच अडचण नसणार आहे. यात एक विशेष म्हणजे भाजपने जातीचा ‘पत्ता खेळत’ मंत्रिपदे देतांना उच्चवर्णीय आणि मागासवर्गीय समानता ठेवली आहे. शपथ विधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपप्रणीत राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

      


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *