गर्लगुंजीत एकलव्य क्रीडा मंडळाच्यावतीने खेळांचे साहित्य वाटप; गावातील ज्येष्ठ नागरिकांची विशेष उपस्थिती..
गर्लगुंजी: विलास कवठणकर ( लोकहित न्यूज)
दिवसेंदिवस व्यसनाच्या आहारी जाणारी तरूण पिढी पाहून मन हळहळून जाते, एकदाच मिळणारे मोलाचे आयुष्य का? बर वाया घालावे. आपण कशासाठी आलोत जन्माला याचे प्रत्येकाने भान ठेवणे गरजेचे आहे, आपण कोणाचा तरी आधार आहोत, आपल्यावर कोणी तरी जीव लावून बसले आहे, किमान याची तरी या युवकांनी पर्वा ठेवावी अन् दारुसह जीवनासाठी घातक ठरणारे व्यसन सोडून द्यावेत असे सर्वांना आवाहन करतानाच, गाव व्यसन मुक्ती, हाच माझा ध्यास असेल, असे प्रतिपादन गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांनी मांडले. क्रीडा क्षेत्रातही करीयर घडवता येते असेही ते पुढे बोलतांना म्हणाले. यावेळी प्रसाद पाटील यांनीच ठेवलेल्या क्रीडा खेळांचे साहित्य वाटप कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
एकलव्य क्रीडा मंडळाचा पुढाकार; 50 जर्शी, खेळांचे किट बॅग बॉटलचे वाटप…
गावातील एकलव्य क्रीडा मंडळाचा पुढाकाराने 50 जर्शी, खेळांच्या किट बॅग बॉटलचे वाटप करण्यात आले. याचे प्रयोजक ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत यांनी बोलतांना खेळांचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाळ पाटील होते. यावेळी प्रायोजक म्हणून बाबुराव मेलगे, संतोष मेलगे, परशुराम गोरे, ग्राम पंचायत सदस्य हणमंत मेलगे, कृषी पत्तीन अध्यक्ष संजय पाटील, शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष गोकुळ चौगुले, संतोष पाटील, संभाजी मेलगे, मऱ्याप्पा पाखरे, मोहन भातकांडे, माजी सैनिक बाबुराव मेलगे, एकलव्य क्रीडा मंडळाचे प्रशांत पाखरे, सुमित मेलगे, साईराज गोरे, योगेश मेलगे, स्वप्नील पाटील, अमोल खतोरे, सूरज गोरे, नागराज गोरे, वेदांत मेलगे, श्रीधर मलिक, जकणू गोरे, ओमकार चौगुले, दिपक चौगुले, दिपक चौगुले , पुंडलिक पाटील, राज्यस्तरीय खेळाडू वैभव गोरे, मारूती पाटील, राष्ट्रीय ज्युडो खेळाडू रोहिणी पाटील यांच्यासह खेळाडू, गावकरी व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.






Leave a Reply