हरसनवाडी- कांजळे रस्त्यासाठी आ. विठ्ठल हलगेकर यांच्याकडून 10 लाख 50 हजाराचा निधी मंजूर….


ग्राम पंचायत सदस्य संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर यांची माहिती; मुतगेकर आणि ॲड. सोनाप्पा नांद्रणकर यांच्या प्रयत्नांना यश..

खानापूर : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

           दहा वर्षांपूर्वी जांबोटी मार्ग ते हरसनवाडी कांजळे रस्त्याचे डांबरीकरण पंतप्रधान सडक योजनेतून झाले होते. मात्र, अलीकडेच हरसनवाडी नाला ब्रीजजवळील रस्त्यावर भला मोठा खड्डा पडल्याने बससह सर्वच वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर आणि कांजळे गावचे सुपुत्र उच्च न्यायालयाचे वकील ॲड. सोनाप्पा नांद्राळकर यांनी आ. विठ्ठल हलगेकर यांच्याकडे सदर रस्ता दुरुस्तीची मागणी लावून धरली आणि अखेर आ. हलगेकर यांनी मुख्यमंत्री सडक योजनेतून खराब झालेल्या हरसनवाडीजवळील खराब रस्त्यासाठी 10 लाख 50 हजाराचा निधी मंजूर केला असून, त्याची दोन दिवसापूर्वी (11 तारखेला) निविदा अर्थात टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या निधीतून खड्डा पडलेल्या रस्त्यावर काँक्रेट टाकण्यात येणार असून, लवकरच हे काम मार्गी लागणार असल्याची माहिती, विनायक मुतगेकर यांनी लोकहित न्यूज शी बोलताना दिली. त्याबद्दल आमदार विठ्ठल हलगेकर यांचे गावकऱ्यांतर्फे अभिनंदन केले जात आहे..

ग्राम सदस्य विनायक मुतगेकर, ॲड. सोणाप्पा नांद्राळकर यांच्या प्रयत्नांना यश ….

      हरसनवाडी – कांजळे रस्त्यासाठी तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर आणि ॲड. सोनाप्पा नांद्राळकर यांनी केलेल्या अथक परिश्रम आणि प्रयत्नांना यश आले असून, त्याच्याच पाठपुराव्याने या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. याकामी रामगुरवाडी पंचायत सदस्य कमिटी- पीडीओ यांचेही सहकार्य लाभले आहे. यासाठी विनायक मुतगेकर आणि ॲड. सोणप्पा नांद्राळकर यांनी सबंधित कार्यालयीन पाठपुरावा केला, त्याबद्दल त्यांचे गावकऱ्यातून अभिनंदन केले जात आहे.

    

प्रतिक्रिया –

हरनवाडी – कांजळे रस्त्यासाठी सबंधित कार्यालय ते न्यायालयीन लढा दिला आहे. याकाळात अधिकाऱ्यांनी आमची पळवापळव केली तरीही आम्हीं प्रयत्न सोडले नाहीत. अखेर आ. विठ्ठल हलगेकर यांच्याकडे निधीची मागणी केली असता, त्यांनी ती तत्काळ मंजूर केली. त्याबद्दल आमदार साहेबांचे आभार..

विनायक मुतगेकर, तालुका अध्यक्ष ग्राम पंचायत सदस्य संघटणा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *