लोकहित न्यूज चा एफेक्ट: ओलमणीकडील ‘ते’ झाड लवकरच हटवणार: आ. विठ्ठल हलगेकर


आमदारांची वनखाते रेंजर श्रीकांत पाटील यांना धोकादायक झाडे हटविण्याची सूचना…

 

जांबोटी: लोकहित न्यूज

        तासाभरापूर्वीच ‘लोकहित न्यूज’ ने खानापूर -जांबोटी रस्त्यावरील ओलमणीकडील ते झाड धोकादायक या अशयाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत आ. विठ्ठल हलगेकर यांनी तत्काळ रेंजर श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून सदर झाड लवकरात लवकर हटविण्याची सूचना केली, त्यानुसार लवकरात लवकर हे झाड हटवण्यात येईल, असे सांगतानाच लोकहित न्यूज च्या वृताने ही समस्या सुटणार आहे. आ. हलगेकर यांनी लोकहित न्यूज चे कौतुकही केले.  लागलीच वनखाते याबाबत कारवाईला लागले असून, लवकरच सदर झाड हटवण्यात येणार आहे. आमदारांच्या दक्षतेमुळे ही समस्या सुटणार आहे.

   

हे झाड म्हणजे वाहतुकीसाठी धोकाच होता…

    ओलमणीकडील रस्त्यावर आलेले ‘ते’ झाड कधी ना धोकाच होणार होता. ते आता हटवण्यात येणार असल्याने नागरीक सुटकेचा निःश्वास सोडतील अश्याही प्रतिक्रिया येत आहेत.. शिवाय जांबोटी -खानापूर रस्त्यावरील अनेक वळणांवरील झाडे, बांबूही बाजूला करण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया –

    लोकहित न्यूजमध्ये आलेली खानापूर जांबोटी रस्त्यावरील ओलमणी गावाजवळ वळणावर रस्त्यावर आलेले झाड हे वृत्त वाचले आणि तत्काल रेंजर श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून तत्काळ सदर धोकादायक झाड हटवा अशी सूचना दिली आहे. त्यानुसार लवकरच ही समस्या सुटेल..

आमदार विठ्ठल हलगेकर…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *