,

‘लोकहित न्यूज’चा’ दणका..       देवाचीहट्टी अंगणवाडीकडील लाईट खांब पंचायतीने हटविले…


गावकऱ्यातून समाधान; अंगणवाडी इमारतीच्या कामाला येणार गती…

  देवाचीहट्टी: लोकहित  न्यूज वृत्तसेवा

      बैलुर ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या देवाचीहट्टी ( ता. खानापूर)  येथील नूतन अंगणवाडी इमारतीच्या स्लॅबसह पुढील कामाला अडथळा ठरलेल्या विद्युत तारा व खांब पंचायत आणि हेस्कॉमकडून अखेर हटवण्यात आले आहे. 22 ऑक्टोंबरला लोकहित न्यूज ने ‘देवाचीहट्टी अंगणवाडीला बैलुर पंचायतीचा शॉक ‘ असे वृत्त प्रसिद्ध केले होते. याची जिल्हा पंचायतीने दखल घेत तात्काळ ही समस्या निकालात काढण्याची सूचना डीएसटू बसवराज अडवीमठ यांनी बैलुर पंचायत पीडीओ सागरकुमार बिरादार यांना दिली. त्यांनतर लागलीच खडबडून जागे झालेल्या पीडीओंनी जोरदार हलचाली करत समस्या निकालात काढण्याचे काम हाती घेतले. आणि आठवडाभरातच अंगणवाडी इमारतीसाठी धोकादायक ठरलेल्या विद्युत तारा आणि खांब हटवण्यात आले. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात असून, लोकहित न्यूज चे कौतुक होत आहे. याकामी देवाचीहट्टीचे ग्राम पंचायत सदस्य प्रदिप कवठणकर यांचेही प्रयत्न फलदायी ठरले आहेत.

खांब आणि तारा हटविल्याने अंगणवाडी इमारतीच्या कामाला येणार गती…

      सदर विद्युत तारा आणि खांबामुळे अंगणवाडी इमारतीच्या कामाला अडथळा निर्माण झाला होता, शिवाय पुढील काम थांबले होते. आता ही समस्या सुटल्याने पुढील कामाला जोर येणार आहे, तरी कंत्राटदारांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे अशी मागणी देवाचीहट्टी गावकऱ्यांतून होत आहे..

    


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *