नुकसानग्रस्त शाळा,अंगणवाडी रस्त्यांसाठी तत्काळ 10 कोटी मंजूर करा…


खानापूरचे आ. विठ्ठल हलगेकर यांची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी ..

बंगळूर : लोकहित न्यूज ..

      खानापूर तालुक्यात शाळा, अंगणवाडी, रस्त्यांची दुरवस्था झाली असून, नागरीकांना अनेक समस्यांशी सामना करावा लागत आहे. शिवाय अनेक यात्रा, उत्सवांसाठी शासकीय मदतीची गरज आहे, त्यासाठी तात्काळ 10 कोटींचा निधी मंजूर करण्याची मागणी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बंगळूरात क्रांतिवीर संगोळी रायन्ना प्राधीककरणाच्या बैठक पार पडली, त्यावेळी आ. विठ्ठल हलगेकर यांनी तालुक्यांतील विविध समस्यांवर आपले विचार मांडले. बालक वसतिगृह, अनुसूचित जाती जमाती विद्यार्थांसाठी वेगळे  वसतिगृह , मराठी – कन्नड भवन, मुरारजी देसाई निवासी शाळा तसेच एपीएमशी मधील भवन पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नंदगड पंचायत अध्यक्ष यल्लाप्पा गुरव यांनीही उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *