खवय्यांसाठी अती स्वादिष्ट जेवनावळीची जणू पर्वणीच; चोर्ला मार्गाला कालमणी क्रॉसवर शुक्रवारी (दि.31)पाटील रेस्टॉरंटचे ( हॉटेल) उद्धघाटन …
जांबोटी: लोकहित न्यूज( विलास कवठणकर)
जांबोटी पश्चिम भागातील जंगलात सफर करणाऱ्यांसाठी ‘खुश खबर ‘ येथील जंगलाच्या खुशीत शुद्ध हवेची मजा घेत अति स्वादिष्ट जेवनावळीची चव चाखण्यासाठी चोर्ला मार्गाला लागूनच कालमणी क्रॉसवर पाटील रेस्टॉरंट ( हॉटेल) सज्ज झाले असून, शुक्रवारी दिनांक 31 रोजी पर्यटकांच्या सेवेशी कार्यरत असेल . याठिकाणी गिऱ्हाईकांच्या मागणीनुसार घतघुती प्रकारचे शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी अती स्वादिष्ट जेवण उपलब्ध असेल असे रेस्टॉरंटचे मालक माजी केडीपी मेंबर प्रकाश पाटील यांनी लोकहित न्यूज’ शी बोलतांना दिली.
कुठे ‘पाटील ‘रेस्टॉरंट… त्याठिकाणी कसे पोहचता येईल..
जांबोटी – चोर्ला पणजी मार्गाला लागूनच हे रेस्टॉरंट असून, जांबोटीपासून गोव्याच्या दिशेला पाच किलो मिटर अंतरावर आहे, तर कणकुंबीतून जांबोटीच्या दिशेला 9 किमी अंतरचा प्रवास होतो. या रेस्टॉरंटच्या आजूबाजूला जंगलझाडी असल्याने जणू निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही असे हे ठिकाण. प्रत्येकाने नक्कीच भेट देण्यास हरकत नाही!
…शुभारंभाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे प्रकाश पाटील यांचे आवाहन….
शुक्रवारी सकाळच्या सत्रात पाटील रेस्टॉरंटचे उद्धघाटन होणार आहे. तरी भागांतील नागरीक अप्तेष्ट मित्र मंडळींनी उपस्थीत रहावे असे आवाहन रेस्टॉरंट चे मालक श्री .प्रकाश पाटील व सौ . मनीषा प्रकाश पाटील यांनी केले आहे.







Leave a Reply