‘गवाळीत’ गवी रेड्याचा हल्ला; एक जण गंभीर जखमी…


शेताकडे जात असलेल्या शेतकऱ्यावर गवीरेड्याने अचानक हल्ला चढविला; टेम्पोतून दवाखान्यात दाखल…

खानापूर : लोकहित न्यूज

       शेताकडे जात असलेल्या शेतकऱ्यावर गवी  रेड्याने अचानक हल्ला चढविल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गवाळीत (ता.खानापूर ) शुक्रवारी घडली.  प्रकाश गुरव (वय .55) असे जखमीचे नाव आहे. गुरव हे आपल्या पत्नीसह शेताकडे जात होते, यावेळी वाटेतच असलेल्या गवी रेड्याने अचानक हल्ला केल्याने प्रकाश यांच्या बगलेतून पाठीमागे गव्याचे शिंग घुसल्याने गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना टेम्पोतून खानापूर च्या शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याचा पंचनामा करून वनखात्याने तात्काळ शासकीय मदत मिळवून द्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे…

फोटो  क्रमांक -2  घटनेची माहिती देताना, गावचे नागरीक…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *