बैलूर ‘ लक्ष्मीच्या ‘पालव्यांची देवाचीहट्टीत पूजा!
भक्तिमय वातावरणात घेतले गावकऱ्यांनी दर्शन ..
देवाचीहट्टी: लोकहित न्यूज ..
पुढील वर्षी बैलुर ( ता. खानापूर) येथे 12 वर्षांनी होणाऱ्या देवाचीहट्टी, बाकनूर ,मोरब आणि बैलूर गावच्या मिळून लक्ष्मी यात्रेसाठी सोडण्यात आलेल्या पालव्यांची देवाचीहट्टीत भक्तीभावाने पूजा करण्यात आली. प्रारंभी गावची ग्राम देवता खुट्टीमाता देवतेचे दर्शन घेऊन, ग्रामदैवत हेळेदेव मंदिरासमोर गावकऱ्यांकडून पूजा-अर्चा आटोपून घेण्यात आले, चव्हाटा देव पूजन केल्यानंतर, गावात घरपती देवीच्या पालव्यांची भक्तीभावाने पूजा करण्यात आली. यावेळी ग्राम पंचायत सदस्य प्रदिप कवठणकर, भोमांनदार तथा माजी ग्राम पंचायत सदस्य सुरेश कुंभार, पत्रकार विलास कवठणकर व मारूती कवठणकर, सामाजिक कार्यकर्ते सखाराम धुरी , पंचायत आधिकारी तुकाराम कुंभार , संतोष कुंभार, अजय कवठणकर, नंदू कालमणकर, महादेव केरीकर, सहदेव केरीकर, बळीराम कालमणकर यांच्या घरी तसेच गावातील प्रत्येक गावकऱ्यांच्या घरासमोर पूजा करण्यात आली. यावेळी प्रल्हाद कांबळे, मनोहर कांबळे, नागो पत्रे, पुंडलिक कांबळे यांच्यासह राकेश कांबळे, भोजू बामणे, दुलाजी कुंभार , समीर कवठणकर, जोतिबा कुंभार, अनंत धुरी, परशुराम गंगाराम गावडे, संजय धूरी, प्रल्हाद धुरी, महादेव गोवेकर, शिवाजी कवठणकर , विजय धुरी यांच्यासह गावकरी उपस्थित होते.



