पंचायत आणि पोलिसांच्या मदतीने उभारला झेंडा ; पण, दोषींवर कठोर झालीच पाहिजे!


भीम आर्मीसह विविध संघटनांनी जोरदार मागणी; जांबोटी निळा झेंडा छेडछाड प्रकरण…

जांबोटी: लोकहित न्यूज

        संतप्त झालेल्या जांबोटी भीम आर्मीसह विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा देताच जांबोटी येथील निळ्या झेंड्याची पोलीस आणि जांबोटी पंचायतीच्या मदतीने पुन्हा उभारणी करण्यात आली खरी, पण जोपर्यंत याप्रकरणातील दोषींना शोध घेवून कारवाई होत नाहीं तोपर्यंत आम्हीं आंदोलनाच्या कायम तयारीत असेन, असा इशारा तालुका भीम आर्मीचे अध्यक्ष संदीप चलवादी यांनी जांबोटीत दिला. झेंडा उभारून आमची समस्या सुटणार नाही तर याप्रकणातील दोषींवर कठोर कारवाई केल्यानंतरच आम्हाला न्याय मिळेल, त्यादिशेने पोलीस यंत्रणेने तपास करून तात्काळ सामाजिक तेढ मजवणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत तरच अशा घटना भविष्यात घडणार नाहीत असेही चलवादी म्हणाले. यावेळी जिल्हा भीम आर्मीचे अध्यक्ष मुडकप्पा येतियापुर, जिल्हा भीम आर्मीचे प्रधान सचिव नागेश कांबळे, जांबोटी ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुनील देसाई, खानापूर भीम आर्मीचे उपाध्यक्ष राम तलवार, जांबोटी भीम आर्मीचे अध्यक्ष राजू कुर्लेकर, पीडीओ राजू तलवार, सचिव नारायण पाटील, जांबोटी आऊट पोस्टचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाहुबली, सह पोलीस कुलकर्णी व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *