मान्यवरांचे विचार; जांबोटीत महर्षी श्री वाल्मिकी जयंती उत्सव !
जांबोटी: लोकहित न्यूज
हिंदू धर्मातील प्रसिद्ध पुराण श्री रामायणाचे पुरस्कर्ते महर्षी श्री वाल्मिकी यांच्यामुळेच पुरुषोत्तम श्री रामांसारखे व्यक्तिमत्व समाजाला समजले असे मत जांबोटीतील महर्षी श्री वाल्मिकी यांच्या जयंती उत्सवात मान्यवरांनी मांडले. यावेळी जिल्हा भीम आर्मी प्रधान सचिव नागेश कांबळे,भीम आर्मी जांबोटी उपाध्यक्ष नागेश तलवार ,भाजप नेते दौलत कोलीकर , राजू तलवार, राजू चिखलकर, प्रसाद कुडतरकर, महादेव तलवार, लक्ष्मण कुर्लेकर, रविंद्र हळदणकर, बसवराज होंदरकट्टी, दत्ता जांबोटकर, दीपक साखळकर, मदन कुडतुकर, एकनाथ नागवेकर, दत्तू कांबळे, परशुराम गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. जांबोटी विभाग भीम आर्मीचे अध्यक्ष राजू कुर्लेकर यांनी सर्वांचे स्वागत केले.







Leave a Reply