July 21, 2026

वडगांवात (जांबोटी)  अतिवृष्टीमुळे शेड पडून दोन ट्रॅक्टरांचे नुकसान..

0
IMG_20251001_161858.jpg

जांबोटी ग्राम पंचायत उपाध्यक्ष व गावचे सदस्य सुनिल देसाई यांच्याकडून पाहणी..

  जांबोटी: लोकहित न्यूज ..

     गेल्या आठवड्यापासून परतलेल्या पावसाने पून्हा थैमान घातले असून, जांबोटी मोठ्या पावसाने हजेरी लावली. पावसाबरोबर वादळाचेही प्रमाण अधिक असल्याने पिके, घरांची पडझड झालेली आहे. वडगांव ( जांबोटी ) येथे अतिवृष्टीमुळे शेड पडून सागर दळवी यांच्या दोन ट्रॅकरांचे मोठे नुकसान झाले आहे. शेडमध्ये मोठ मोठे लाकडाचे वजनदार ओंडके ट्रॅक्टरवर पडून ट्रॅक्टरचा समोरील भाग व मागील भागाचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच गावचे ग्राम पंचायत सदस्य तथा जांबोटी पंचायत उपाध्यक्ष सुनिल देसाई यांनी घटस्थळी जावून पाहणी केली. तरी सरकारनेही या घटनेची दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

    

        


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *