‘लोकहित’ न्यूज च्या वृत्ताची ग्राम पंचायतीकडून दखल….
जांबोटी: लोकहित न्यूज
आमटे ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील आमटे क्रमांक – 2 च्या अंगणवाडीजवळ शेणाचे ढीग टाकत पंचायतीच्या मालकीच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्यांना पीडीओ एम.एस मोकाशी आणि पंचायत कमिटीने नोटीस बजावली, पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुदतीच्या आत स्वतःहून जागा न सोडल्यास कायदेशीर कारवाई करण्याच्या इशाराही देण्यात आला आहे. ‘लोकहित न्यूज’ ने शनिवारी याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची दखल घेत खडबडून जागे झालेल्या ग्राम पंचायतीने तात्काळ कारवाईचे पाऊल उचलले आहे, अशी माहिती पीडीओ एम. एस मोकाशी यांनी लोकहित न्यूज शी बोलताना दिली.
…पीडीओ -सदस्यांकडून घटनास्थळाची पाहणी…
‘लोकहित न्यूज’ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या पीडीओ एम.एम मोकाशी , सदस्य मारुती गांवकर , अध्यक्षा सरस्वती भरणकर यांचे पती कृष्णा भरणकर यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. शिवाय ज्यांच्या विरोधात तक्रार आहे, त्यांना पुन्हा बजावण्यात आले. ठरलेल्या मुदतीत जागा मोकळी करून देण्याची सूचनाही पीडीओंकडून देण्यात आली.
… काय आहे त्या नोटिसात….

ग्राम पंचायतीच्या राखीव गावठाण जागेत तुम्हीं शेण, कचरा टाकला आहे, ती जागा आमटे अंगणवाडी क्रमांक – 2 बाजुला असून, शेणाच्या घाण आणि कचऱ्यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, त्यांना त्या घाण वासेचा त्रास होत आहे. अशी लेखी तक्रार स्थानिक नागरिकांनी आमच्याकडे दिली आहे, त्यावर त्या समस्येची दखल घेणे आमच्यासाठी क्रमप्राप्त आहे. आम्ही विचार करून हा निर्णय घेत असून आपल्याला नोटीस बजावली आहे. तरी तुम्हीं नोटिसात नोंद केल्याप्रमाणे पंधरा दिवसांच्या आत जागी खाली करून द्यावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे.






Leave a Reply