मलप्रभा कारखान्यावर मंत्री हेब्बाळकर पॅनेलची सत्ता…


शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरणार; मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती..

खानापूर. :लोकहित न्यूज

       संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मलप्रभा साखर कारखान्यावर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुनश्च पॅनेलने बाजी मारली असून, या गटाचे एकूण 15 उमेदवार विजयी झाले आहेत. विधान परिषद सदस्य चंनराज हट्टीहोळी, खानापूर चे आमदार विठ्ठल हलगेकर, आ. बाबासाहेब पाटील यांचा पॅनेल आणि सत्ताधारी गटामध्ये चांगलीच चुरस लागली होती. अखेर मंत्री हेब्बाळकर यांच्या गटाने बाजी मारत बदल घडवून आणला आहे. विजयाची माहिती मिळताच मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर,आ. विठ्ठल हलगेकर, विधान परिषद सदस्य चनराज हट्टीहोळी, आ. बाबासाहेब पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष साजरा केला.

    

शेतकऱ्यांनी विश्वास ठेवल्याने आमचा विजय: मंत्री हेब्बाळकर

     शेतकऱ्यांनी बदल हवा होता, त्यामुळेच त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला म्हणूनच आमचा विजय सोपा झाला. शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरून यापुढे कारभार चालेल..

आमचे कार्य पाहून शेतकऱ्यांचा कौल: आ. विठ्ठल हलगेकर

     सहकार क्षेत्रात आम्ही आतापर्यंत केलेले काम पाहून शेतकऱ्यांनी कौल दिला आहे. त्यांचा विश्वास सार्थकी लावू..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *