भक्तिमय वातावरणात गावकऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग…
जांबोटी : लोकहित न्यूज
शहीद जवान धोंडीबा देसाई यांच्यासह अनेक जवानांनी देशासाठी बलिदान सार्थकी लावलेल्या वडगावात (ता. खानापुर) आज सकाळीच्या पहारी जांबोटी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने दुर्गा माता दौड काढण्यात आली. दौडने शूरवीरांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्याचे दिसून आले. याच गावाजवळ असलेल्या नवनाथ दरबार मठाला भेट देत , मठाधीश मदन महाराज कणगुटकर यांचे दर्शन घेऊन दौडची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शहीद जवान धोंडीबा आहे याच्या स्मारकाला भेट देवून गावात घोषणा देत येथील श्री गणेश मंदिराकडे दौडची सांगता करण्यात आली. यावेळी जांबोटी ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुनिल देसाई यांनी भगवा ध्वज हाती घेवून भाग घेतला होता. यावेळी जांबोटी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष सचिन कुडतूरकर, उपाध्यक्ष मारुती हळब, माजी अध्यक्ष मनोहर गोवेकर , मार्गदर्शक मदन कुडतूरकर, मिथुन कुंभार, संजय गावडे, किरण कोलीकर, मयूर किनारी यांच्यासह वडगांवमधील युवक -युवतींना मोठ्या संख्येने सहभाग, वडगांव गणेश मंडळाचे अध्यक्ष मुकुंद देसाई यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







Leave a Reply