हुळंद एकावर अस्वल हल्ला; जखमीला बेळगावला दवाखान्यात दाखल..


गावाजवळील ग्राउंड जवळ येवून केला हल्ला; अस्वल हल्ले वाढले, वनखात्याने बंदोबस्त करण्यासाठी गरज..

कणकुंबी: लोकहित न्यूज

     गावाजवळ येवून अस्वलाने हल्ला केल्याची घटना हुंळंद ( ता. खानापूर) गावात आज सायंकाळीं 5 च्या सुमारास घडली आहे. वासुदेव नारायण गावडे अंदाजे (वय .48) असे जखमीचे नाव आहे. जखमीला बेळगावला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. हल्यात एक डोळा पूणपणे गेला असून, कपाळावर मोठी जखम झाली आहे. अलीकडच्या काळात अस्वल हल्ले वाढले असून, वनखात्याने बंदोबस्त करण्यासाठी गरज आहे.

वनखात्याने मदत न केल्यास तालुका काँग्रेस गप्प बसणार नाही

      वनखात्याच्या हलगर्जीपणामुळे हा हल्ला झाला असून, जखमीला तात्काळ लागेल ती मदत न केल्यास तालुका ब्लॉक काँग्रेस गप्प बसणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. जखमीबद्दल ब्लॉक काँग्रेसने एसीएफ सुनीता नींबरगी यांच्याशी काँग्रेस ने संपर्क साधला असुन, त्यांनी सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगितले अशी माहिती काँग्रेस नेते सुरेश जाधव यांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *