ग्रामस्थांतून समाधान; कोचेरी यांचा गावकऱ्यांच्याहस्ते सत्कार…
मोदेकोप: लोकहित न्यूज..
अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या मोदेकोप ( ता.खानापूर) गावाला जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या प्रयत्नातून बस व्यवस्था झाली आहे. खानापूर ते मोदेकोप या बस सेवेमुळे रामगुरवाडी, हसणवाडी, विश्रांतवाडी, निलावडे फाटा, कान्सूली, नगुर्डावाडासह मोदेकोपलगत असलेल्या काटगाळी गावांना लाभ होणार असून, शाळकरी मुलांची गैरसोय दूर होणार आहे. पहिल्यांदाच गावात बस येताच गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
यावेळी गावच्या दृष्टीने मोठें कार्य केल्यामुळे जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांचा गावकऱ्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य नारायण कार्वेकर, कुलंम मामा यांच्यासह गावचे पंच व गावकरी उपस्थित होते. यावेळी चालक -वाहक यांचाही सत्कार करण्यात आला. बस सेवा सुरू झाल्यामुळे गावकऱ्यातून समाधान व्यक्त केले जात आहे…






Leave a Reply