शांतीनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन शनिवारी (उद्या) ; जिल्ह्यातील 200 शाळा होणार सहभागी…


विज्ञान गणित, वैदिक गणित, संस्कृत विषयावर प्रश्नमंजुषा व संस्कृत पठण…

   

खानापूर  : लोकहित न्यूज

     खानापूर येथील महालक्ष्मी एज्युकेशन सोसायटीच्या शांतीनिकेत पब्लिक स्कूलमध्ये शनिवार (उद्या.30) रोजी शांतिनिकेतन स्कूल आणि बेळगांव विध्याभरती यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये जिल्ह्यातील 200 हून शाळा त्यामध्ये भाग घेणार आहेत. यावेळी विज्ञान गणित, वैदिक गणित, संस्कृत विषयावर प्रश्नमंजुषा, संस्कृतपठण प्रदर्शित करण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन सकाळीं 9 वाजल्यापासून सुरू होणार असून, पालक आणि विद्यार्थ्यांनी सकाळीं 10 ते 1 यावेळेत उपस्थीत राहून लाभ घ्यावा असे शांतिनिकेतन स्कूल च्या वतीने कळविण्यात येत आहे.

   


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *