,

जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी घेतली धर्मस्थळ विश्वस्त डॉ. विरेंद्र हेगडे यांची भेट..


धर्मस्थळप्रकरणी बेळगांव – खानापूरवासिय आपल्या पाठीशी राहण्याची हेगडे यांना दिली हमी..

     

धारवाड : लोकहित न्यूज

      नेहमीच सामाजिक कार्यासाठी झोकून घेणारे खानापूरचे प्रभावी नेते , जैन समाजाचे नेते तथा जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी धारवाड येथे आलेले श्री धर्मस्थळचे मुख्यस्त्त डॉ. वीरेंद्र हेगडे यांची भेट घेऊन सध्या मृतदेह प्रकरणामुळे होत असलेली धर्मस्थळाची ‘ बदनामी हे एक राजकीय षडयंत्र असून, बेळगांव आणि खानापुरातील जनता तुमच्या पाठीशी कायम राहील अशी हमी दिली. यावर बोलतांना डॉ. हेगडे यांनी कोचेरी यांचे तोंडभरून कौतुक केले.

पुढे ,बोलतांना प्रमोद कोचेरी यांनी परवा परवाच बेळगावमध्ये काढलेल्या विराट मुक मोर्चाची माहितीही यावेळी दिली. बेळगांव दक्षिणचे आ. अभय पाटील यांच्या पुढाकाराने काढलेल्या या मोर्चात वीस हजारहून अधिक हिंदू बांधव सहभागी झाले होते, ते पाहून शासन हादरून गेले होतें. यामध्ये विशेष म्हणजे विविध माठधिशांनीही भाग घेतला होता. त्यामुळे या मोर्चाची याची दखल राज्य शासनाने घेतली असून, लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल असे सरकारकडून सूचित करण्यात आले आहे. आमचीही तशीच मागणी करत अहोत, असेही कोचेरी यांनी डॉ. विरेंद्र हेगडे यांच्याशी बोलतांना स्पष्ट केले. यावेळी अभय अवलक्की, अशोक पाटील, राजू जक्कन्नावर यांनीही उपस्थितीत होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *